एकलहरा रोड येथे घरात घुसून महिलेची हत्या; एक गंभीर
एकलहरा रोड येथे घरात घुसून महिलेची हत्या; एक गंभीर
img
Chandrakant Barve
नाशिकरोड (प्रतिनिधी) : एकलहरा रोड येथे पाणीपुरी विक्रेत्याच्या पत्नीचा अज्ञात इसमांनी घरात घुसून गळ्यावर चाकूचे वार करून हत्या केल्याची घटना घडली आहे.
याबाबत सुदाम रामसिंग बनेरिया (वय 35, रा.  सामनगाव, एकलारा रोड, नाशिक रोड) यांनी दिलेल्या फिर्यादित म्हटले आहे की, ते काल दुपारी 4 वाजेपासून रात्री 9.30 पर्यंत ते एकलहरा  मेनगेट नाशिकरोड येथे पाणीपुरी विक्रीचा व्यवसाय करत होता.

त्यावेळी त्याची पत्नी पत्नी क्रांती  बनेरिया (वय 25) ही फिर्यादीचा भाचा अभिषेक (वय 22) हे दोघे घरात होते. त्यावेळी  अज्ञात इसमांनी अज्ञात कारणासाठी बनेरिया यांच्या घरात प्रवेश करुन क्रांती बनेरिया हिच्या गळ्यावर चाकूचे वार करून जीवे ठार मारले तर फिर्यादीचा भाचा अभिषेक याला मारहाण व गंभीर जखमी करून जीवे ठार मारण्याचा प्रयत्न केला.

याप्रकरणी नाशिकरोड पोलीस ठाण्यात अज्ञात हल्लेखोरांविरुद्ध खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक आर. आर. शेळके करीत आहे. 

इतर बातम्या
Join Whatsapp Group