Nashik Crime धक्कादायक : पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या
Nashik Crime धक्कादायक : पत्नीचा खून करून पतीचीही आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : नाशिकमधून एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. नाशिकमध्ये पत्नीची हत्या करून घरातील छताच्या अँगलला गळफास घेऊन पतीनेही आत्महत्या केल्याने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.  

नेमकं काय घडलं ? 
अंबड येथील खालच्या चुंचाळे परिसरातील हनुमान मंदिराजवळील मनपा शाळेच्या मागील भागातील भाड्याच्या घरात चेतन माडकर (वय - ३३) आणि पत्नी स्वाती चेतन माडकर (वय - २७) राहत होते. त्यांना तीन मुले आहे. घटनेच्या वेळी घरात मुलगा आणि मुलगीच होती. सोमवारी मध्यरात्री दोन ते तीन वाजेच्या सुमारास चेतनने कौटुंबिक वादातून पत्नी स्वाती हिचा गळा आवळून खून केला. 

वो बुलाती है मगर जाने का नही ! गर्लफ्रेंडचा भयंकर कट, गोड बोलून बोलावलं अन्...

धक्कादायक म्हणजे त्यानंतर घरातील छताच्या अँगलला ओढणीच्या सह्याने गळफास घेऊन त्याने स्वतः ही आत्महत्या केली.  मिळालेल्या माहितीनुसार पती-पत्नी मध्ये काही दिवसांपासून काही कौटुंबिक वाद होते. रात्री लहान मुलाला जाग आली ही घटना पाहून त्याने पाठिमागे राहणाऱ्या आजीला सांगितले. या नंतर घटनेची माहिती पोलिसांना मिळता पोलीस घटनास्थळी दाखल झाली.  याप्रकरणी अंबड एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद झाली आहे. पोलिस उप निरीक्षक शेवाळे पुढील तपास करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group