वो बुलाती है मगर जाने का नही !  गर्लफ्रेंडचा भयंकर कट, गोड बोलून बोलावलं अन्...
वो बुलाती है मगर जाने का नही ! गर्लफ्रेंडचा भयंकर कट, गोड बोलून बोलावलं अन्...
img
वैष्णवी सांगळे
दैनिक भ्रमर : छत्रपती संभाजीनगर शहरातून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. लग्नाला नकार दिल्याने एका प्रियसीने प्रियकराची हत्या केली आहे. 

३१ जुलैला दुपारी साडेबारा वाजता 32 वर्षीय सचिन पुंडलिक औताडे हा घरात कोणालाही काहीही न सांगता दुचाकी घेऊन बाहेर गेला होता. त्यानंतर त्याचा काहीही शोध लागला नव्हता. त्यावरून हर्सूल पोलीस ठाण्यात बेपत्ताची नोंद करण्यात आलेली होती.  १३ ऑगस्टला मुंगी येथील शेतकरी सदाशिव राजेभोसले यांच्या शेताच्या कडेला गोदावरी नदीच्या पात्रात मृतदेह आढळला होता. आता अखेर या खुनाचा उलगडा झाला आहे. 


अहिल्यानगर पोलिसांच्या माहितीनुसार, आरोपी भारती दुबे ही स्थानिक छावा संघटनेची महिला पदाधिकारी आहे. सचिन औताडे हा त्याच संघटनेत काम करत होता. ते दोघेही विवाहित आहेत. मात्र, भारतीने फारकत घेतली होती. सचिन आणि भारतीचे प्रेमसंबंध होते. भारतीने त्याच्याकडे लग्नाचा तगादा लावला होता. तो विवाहित असल्याने नकार देत होता. त्याच्या कुटुंबीयांकडूनही या लग्नाला विरोध होता. मात्र, सचिन हा भारतीवर संशय घ्यायचा. 

मृत सचिनचा भाऊ राहुल पुंडलिक औताडे यांच्या फिर्यादीनुसार, त्यांना एका मित्राने माहिती दिली की, ३१ जुलैला सचिन हा त्याची प्रेयसी भारती दुबे हिच्यासोबत होता. ते दोघे जालना येथे चारचाकीने लग्नाला गेले. तेथून परत कॅनॉटमध्ये येऊन फ्लॅटवरच थांबले. त्या रात्री सचिन तेथेच थांबला होता.. 


त्यांच्या या दारूपार्टीत भारतीचा मामेभाऊ दुर्गेश मदत तिवारी (रा. खुलताबाद) सहभागी झाला. नंतर भारतीने अफरोज नावाच्या एका मित्रालाही बोलावून घेतले. दारू पित असताना सचिन आणि भारती यांच्या वाद सुरू झाला. वाद टोकाला इतका टोकाला गेला की, भारती, तिचा आतेभाऊ दुर्गेश आणि मित्र अफरोज या तिघांनी मिळून सचिनला बेदम मारहाण केली. इतकंच नाहीतर त्याचा गळा चिरून हत्या केली. 

खून केल्यानंतर सचिनचा मृतदेह ताडपत्रीत गुंडाळून पिशवीत गुंडाळला आणि तिघांनी मिळून 55 किलोमीटरचा प्रवास करत पैठणमधील गोदावरी नदीत फेकून दिला.अहिल्यानगर पोलिसांनी मृतदेहाची ओळख पटवत चार दिवसांत २ खुन्यांना बेड्या ठोकल्या. अद्याप एक आरोपी पसार आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group