हैदराबादमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. एका महिलेनं तिच्या १० महिन्याच्या बाळाला विष देत स्वतःही आत्महत्या केली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, कौटुंबिक वादातून २७ वर्षीय सुषमाने हे टोकाचे पाऊल उचलले. कौटुंबिक वादविवादामुळे तिने टोकाचं पाऊल उचललं. धक्कादायक म्हणजे मुलगी आणि नातू दोघांच्या मृत्यूनंतर सुषमाच्या आईनेही आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे समोर आले आहे.
सुषमाने चार वर्षांपूर्वी चार्टर्ड अकाउंटंट यशवंत रेड्डी यांच्यासोबत लग्न केले होते. या दाम्पत्याला १० महिन्यांचा मुलगा होता. यशवर्धन रेड्डी असं या मृत मुलाचं नाव . कुटुंबीयांना पोलिसांना दिलेल्या माहितीनुसार गेल्या महिन्यापासून पती-पत्नीमध्ये नेहमी वाद होत होते. सुषमा एका कौटुंबिक कार्यक्रमाच्या खरेदी करण्याच्या बहाण्याने तिची आई ललिता यांच्या घरी गेली होती. घरी पोहोचल्यावर ती मुलाला घेऊन एका खोलीत गेली. तिथे तिने मुलाला विष पाजले आणि त्यानंतर स्वतःही आयुष्य संपवलं.
रात्री जवळपास 9.30 वाजताच्या सुमारास यशवंत रेड्डी कामावरून घरी परतले,तेव्हा बेडरूम आतून बंद असल्याचे त्यांनी पाहिले.त्यानंतर दरवाजा तोडण्यात आला आणि आत पत्नी व मुलगा बेशुद्ध अवस्थेत आढळले.या घटनेची तातडीनं पोलिसांना माहिती देण्यात आली.रुग्णालयात नेल्यानंतर दोघांनाही मृत घोषित करण्यात आले.
मुलगी आणि नातू यांच्या मृतदेहांना पाहून ललिता यांना मोठा धक्का बसला.त्यानंतर त्यांनीही जीवन संपवण्याचा प्रयत्न केला. सध्या त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहेत. पोलिसांनी म्हटलंय की, या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला आहे आणि तपास सुरू आहे.ही घटना पती-पत्नीतील कौटुंबिक वादामुळे घडली आहे. अधिक तपास पोलिसांकडून सुरु आहे.