भयंकर ! आईनेच चिमुकल्याला १२ व्या मजल्यावरुन फेकलं, नंतर...
भयंकर ! आईनेच चिमुकल्याला १२ व्या मजल्यावरुन फेकलं, नंतर...
img
वैष्णवी सांगळे
गुजरातमधील सुरतमधून बुधवारी संध्याकाळी एक हृदयद्रावक घटना समोर आली आहे. सुरतच्या अल्थान परिसरात एका आईनेच आपल्या दोन वर्षाच्या चिमुकल्याला १२ व्या मजल्यावरून फेकून देत स्वतःही उडी घेत आत्महत्या केली आहे. या घटनेचे सीसीटीव्ही फुटेजही समोर आले आहे. 

या भयंकर घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. याठिकाणी असलेल्या गणपती मंडळाच्या मंडपापासून अवघ्या २० फूट अंतरावर मुलाचा मृतदेह पडला होती. सोसायटीत राहणाऱ्या एका व्यक्तीने आई ( पूजा ) आणि मुलाला जमिनीवर पडलेले पाहिले तेव्हा त्याने पोलिसांना माहिती दिली.

सीसीटीव्ही फुटेजमध्ये दिसून येते आहे की, महिला प्रथम तिच्या मुलाला लिफ्टमध्ये वरच्या मजल्यावर घेऊन जाते आणि नंतर तिथून तिच्या मुलाला खाली फेकून देते, मुलगा खाली पडल्यानंतर काही सेकंदातच महिला स्वतः देखील तिथून उडी घेत आत्महत्या करते. आई आणि मुलाचे मृतदेह एकमेकांपासून काही मीटर अंतरावर पडले होते. 

दरम्यान, तिने चिमुरड्याला फेकत स्वतःही आत्महत्या का केली याचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी मृत पूजाचा मोबाईल फोन ताब्यात घेतला आहे. याबाबत पोलिसांकडून अधिक तपास सुरू आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group