नाशिक शहरात तरुणासह विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
नाशिक शहरात तरुणासह विवाहितेची गळफास घेऊन आत्महत्या
img
वैष्णवी सांगळे
नाशिक (भ्रमर प्रतिनिधी) : शहर परिसरात आत्महत्येच्या दोन घटना घडल्या असून, नांदूर नाका येथे तरुणाने, तर पाथर्डी फाटा येथे विवाहितेने गळफास घेऊन आत्महत्या केल्याच्या नोंदी पोलीस ठाण्यांत करण्यात आल्या आहेत. 

आत्महत्येचा पहिला प्रकार नांदूर नाका येथे घडला. प्रवीण लक्ष्मण तोडके (वय 26, रा. जनार्दननगर, नांदूर नाका) हा तरुण राहत्या घरी गळफास घेतलेल्या अवस्थेत मिळून आला. त्याचे भाऊ प्रतीक तोडके यांनी त्याला खाली उतरवून उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटलमध्ये दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून त्याला मृत घोषित केले. या प्रकरणी आडगाव पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार राजोळे करीत आहेत.

नाशिक : गावठी कट्टा, काडतुसे, धारदार कोयता बाळगणारा युवक जेरबंद

आत्महत्येचा दुसरा प्रकार पाथर्डी फाटा येथे घडला. नंदिनी सूरज चव्हाण (वय 22, रा. आनंदनगर, पाथर्डी फाटा) या विवाहितेने राहत्या घरी बेडरूममधील छताच्या पंख्याला ओढणीच्या सहाय्याने गळफास घेतला. ही बाब विवाहितेचे दीर अनिश चव्हाण यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी विवाहितेला औषधोपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे दाखल केले असता डॉक्टरांनी तपासून विवाहितेला मृत घोषित केले. या प्रकरणी इंदिरानगर पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास पोलीस हवालदार पवार करीत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group