शारीरिक समस्यांवर अनेक उपाय आहेत पण मानसिक समस्येवर उपाय मिळत नाही. मानसिक तणावातून अनेकांनी आत्महत्या केली आहे आणि अनेक जण त्या विचारात आहे. गाझियाबादमधूनही अशीच एक खळबळजनक बातमी समोर आली आहे. अविनाश आणि त्याची २५ वर्षीय बहीण यांनी गुरूवारी सायंकाळी विष पिऊन स्वत:ला संपवलं. २८ वर्षीय अविनाश कुमार हे इंटेलिजेंस ब्युरोमध्ये (IB) कार्यरत होते. तर त्यांची २५ वर्षीय बहिणी एका खासगी कंपनीत कामाला होती. या घटनेने परिसरात एकाच खळबळ उडाली आहे.
हे ही वाचा...
कविनगर पोलीस स्टेशनच्या हद्दीतल्या गोविंदपुरम एच ब्लॉक भागात गुरूवारी सायंकाळी ही घटना घडली. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवण्यात आले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,पोलिसांना या घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. तसेच तपासाला सुरूवात केली. तपासादरम्यान, पोलिसांना कोणतीही सुसाईड नोट सापडलेली नाही. संपूर्ण प्रकरणाची चौकशी सुरू आहे. दोघांचेही मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आले आहे. मृत भाऊ -बहिणीचे वडील सुखबीर सिंग हे सरकारी विभागात अधिकारी आहेत. तर, सावत्र आई एका सरकारी शाळेत शिक्षिका आहेत'.
अविनाशची मावशी रेखा यांनी सांगितले की, 'अविनाशची आई २००७ साली वारली. त्यानंतर त्याच्या वडिलांनी दुसरं लग्न केले. सावत्र आई दोघांचाही छळ करत होती. यामुळे दोघांनीही आत्महत्या करण्याचा निर्णय घेतला'. अविनाशच्या मावशीनं केलेल्या आरोपांमुळे पोलीस त्याच दिशेने तपास करीत आहेत.