नाशिकमधून एक खळबळजनक घटना समोर आली आहे. काळीज चिरणारं कारण या आत्महत्येच्या मागे असल्यानं हळहळ व्यक्त आहे. नाशिकमध्ये महिला पोलीस अंमलदाराच्या २० वर्षीय मुलीने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. आत्महत्या करण्यापूर्वी तरुणीने चिठ्ठी लिहिली होती या चिठ्ठीत तरुणीने आत्महत्येचे धक्कादायक कारण सांगितले आहे.
'आई तुला त्रास द्यायचा नाही. माझा शैक्षणिक खर्च फार आहे. तू टेन्शन घेऊ नकोस. तुझी धावपळ होते, असं शेवटच्या चिठ्ठीत लिहत पूजा दीपक डांबरेने आत्महत्या केली आहे. आईला चिठ्ठी लिहिल्यानंतर गळफास घेत महिला पोलिसाची मुलगी पूजाने आत्महत्या केली. पूजा आणि तिची आई ही बिडी कामगारनगर अमृतधाम येथे राहत होत्या.
पूजा नुकतीच बारावी पास होऊन तिने प्रथम वर्षासाठी महाविद्यालयीन शिक्षण सुरू केले होते. पूजाचे वडील विभक्त राहत असल्याने मायलेकी सोबत राहत होत्या. आत्महत्येने नाशिकसह पोलीस वर्तुळात देखील खळबळ उडाली आहे.