बाडमेर जिल्ह्यामधील राजस्थान शहरात एका संपूर्ण कुटुंबाने पाण्याच्या टाकीत उडी घेत आत्महत्या केल्याची धक्कादायक अन् हृदयद्रावक घटना घडली आहे.
आधी मुलाला नवरीसारखं तयार केलं, त्यानंतर फोटो काढले. मुलाचे फोटोशूट झाल्यानंतर आई-बाप, आणि दोन मुलांनी घरातील पाण्याच्या टाकीत आत्महत्या केली.
याबाबत मिळालेल्या माहितीनुसार , शिवलाल (35 वर्षे), पत्नी कविता (३२ वर्षे) आणि त्यांची ८ आणि सहा वर्षांच्या मुलाचे मृतदेह पाण्याच्या टाकीत मिळाले आहेत. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार शिवलाल यांनी प्रथम घराला कुलूप लावले आणि नंतर संपूर्ण कुटुंबासह घराबाहेर असलेल्या पाण्याच्या टाकीत उडी घेतली. शिवलाल यांचा धाकटा भाऊ याने अनेकदा फोन केल्यानंतर कोणताही प्रतिसाद न मिळाल्याने शेजाऱ्यांना याबाबत कलले. त्यावेळी ही धक्कादायक घटना समोर आली.
आत्महत्येपूर्वी मुलाला नवरीप्रमाणे सजवले रिपोर्ट्सनुसार, आत्महत्या करण्यापूर्वी कविताने मुलगा रामदेव याला नवरीप्रमाणे सजवले. त्याला आपले सर्व दागिने घातले, डोक्यावर ओढणी घातली, डोळ्यांना काजळ लावले आणि फोटो काढले.
त्यानंतर काही वेळातच कविता (३२ वर्षे), तिचा पती शिवलाल मेघवाल आणि दोन मुले बजरंग आणि रामदेव यांनी पाण्याच्या टाकीत उडी घेऊन आपले जीवन संपवले. त्यांचे मृतदेह घरापासून २० मीटर अंतरावर असलेल्या पाण्याच्या टाकीत तरंगताना आढळले.
पोलिस उपअधीक्षक (डीएसपी) मानाराम गर्ग यांनी सांगितले की , सामूहिक आत्महत्याबाबात मंगळवारी रात्री उशिरा माहिती मिळाली. परंतु कविताच्या माहेरच्या लोकांना रात्री माहिती मिळाल्यानंतर बुधवारी सकाळी त्यांच्या उपस्थितीत मृतदेह बाहेर काढले गेले. मृतदेह पोस्टमार्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. कविताचा चुलत भाऊ गोपीलाल याने सांगितले की, शिवलाल यांना पंतप्रधान आवास योजनेच्या पैशातून स्वतंत्र घर बांधायचे होते. पण त्यांचा भाऊ आणि आई यांचा याला विरोध होता. या कौटुंबिक तणावामुळे ते मानसिक त्रासात होते. त्यामुळेच त्यांनी टोकाचा निर्णय घेतला होता.
दरम्यान, २९ जून रोजी त्यांनी एक आत्महत्येची चिठ्ठी लिहिली होती. पण तेव्हा त्यांनी टोकाचा निर्णय घेतला नाही. चिठ्ठीत त्यांनी लिहिले होते की, संपूर्ण कुटुंबाचे अंत्यसंस्कार घराबाहेरच करावेत.