'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; वकिलानं आयुष्याचा दोर कापला; धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड
'माझ्या मृत्यूला आई जबाबदार'; वकिलानं आयुष्याचा दोर कापला; धक्कादायक कारण चिठ्ठीतून उघड
img
वैष्णवी सांगळे
सोलापुरातून एक खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथील एका वकिलाच्या आत्महत्येने एकच खळबळ उडाली आहे. त्याच कारणही धक्कादायक आहे.  आत्महत्या करण्यापूर्वी त्यानं चिठ्ठी लिहिली होती. ज्यात त्यानं धक्कादायक कारण सांगितलं आहे. 



सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी असलेला सागर श्रीकांत मंद्रूपकर असे आत्महत्या करणाऱ्या वकील तरुणाचे नाव आहे. 
तो सोलापुरातील विजापूर नाका पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होता. मंगळवारी सागर आणि त्याचे आईचे कडाक्याचे भांडण झाले होते. आईकडून दुजाभाव वागणूक मिळत असल्याचं त्याला वाटलं. याच कारणातून त्यानं राहत्या घरातील बेडरूममध्ये गळफास घेऊन आयुष्य संपवलं.

सागर मंद्रूपकर याने आत्महत्या करण्यापूर्वी चिठ्ठी लिहिली होती. चिठ्ठीत त्यानं, 'आईकडून सतत दुजाभाव मिळत आहे. यामुळे मी आयुष्य संपवत आहे. माझ्या मृत्यूला आई जबाबदार आहे. माझ्या मृत्यूनंतर तिला कडक शिक्षा करा, ही नम्र विनंती'. असं २ पानी चिठ्ठीत आत्महत्या करण्यामागचं कारण सागरनं नमुद केलं. 

मिळालेल्या माहितीनुसार, सागर हा वकील असून, त्याचे वडील नोकरदार आहेत. तर, सागरची बहीण विवाहित आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी तपासाला सुरूवात केली. सोलापुरातील सिविल पोलीस चौकी येथे घटनेची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास विजापूर नाका पोलीस करीत आहेत. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group