नाशिकमधील सिडको परिसरातील एका दाम्पत्याने विष प्राशन करत हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना उघडकीस आली. नागरिकांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्रयत्न अयशस्वी झाला.
नेमकं काय घडलं?
अंबड फडोळ मळा भागात राहणारे दाम्पत्य सचिन गवळी (४०) आणि माया गवळी (३८) यांनी सोमवारी दुपारी घरातील बेडरूमचा दरवाजा बंद करून विष प्राशन केले यानंतर हाताची नस कापून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. यावेळी घरात सचिन यांच्या आई होत्या, तर वृद्ध वडील लहान मुलांना शाळेत घेण्यासाठी गेले होते.
आईने बेडरूमचा दरवाजा ठोठावला, मात्र प्रतिसाद न मिळाल्याने संशय आला. त्यांनी शेजाऱ्यांच्या मदतीने दरवाजा तोडून बघितले असता दोघेही रक्ताच्या थारोळ्यात कोसळलेले आढळून आले.
या दोघांवर उपचार सुरू असून दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगितले जात आहे. गवळी दाम्पत्याने टोकाचे पाऊल का उचलले, यामागील कारण अद्याप स्पष्ट होऊ शकले नाही. याप्रकरणी अंबड पोलिस पुढील तपास पोलीस करत आहेत.