धक्कादायक ! गोरा रंग बनला श्राप ! महिलेसोबत झालं असं काही की दीड वर्षांच्या मुलीसह संपवलं आयुष्य
धक्कादायक ! गोरा रंग बनला श्राप ! महिलेसोबत झालं असं काही की दीड वर्षांच्या मुलीसह संपवलं आयुष्य
img
दैनिक भ्रमर
हुंडाबळीला कंटाळून केरळमधील महिलेनं आपल्या लेकीसह आत्महत्या केली आहे. सासरच्या मंडळींनी हुंड्यासाठी केलेल्या छळाला कंटाळून तिने हे टोकाचं पाऊल उचललं आहे. पीडिता दिसायला सुंदर आणि रंग उजळ असल्यामुळे सासरच्या मंडळींनी तिचे केस कापले. तिला घटस्फोटाची नोटीसही पाठवण्यात आली होती. 

पतीचे विवाहबाह्य संबंध असल्याची माहिती तिला मिळाली. याचा जाब विचारले असता, पतीने तिला बेदम मारहाण केली. तिने आत्महत्या करण्यापूर्वी याबाबतची माहिती एका चिठ्ठीमध्ये लिहून ठेवली होती. याच त्रासाला कंटाळून महिलेनं आयुष्य संपवलं. दरम्यान, या प्रकरणात पोलिसांनी ३ आरोपींविरोधात गुन्हा दाखल केला आहे.

पीडित महिला केरळमधील कोल्लम कुंडारा पोलीस स्टेशन परिसरातील रहिवासी होती. ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत राहत होती. मृत विवाहित महिलेच्या आईच्या तक्रारीनुसार, विरंजिका मणी असे मृत महिलेचे नाव आहे. ८ जुलै रोजी शारजाहमधील अल नहदा येथे आधी दीड वर्षीय पोटच्या चिमुकलीला संपवलं. नंतर स्वत: आत्महत्या केली. लग्नानंतर पीडित व्यक्तीच्या कुटुंबाने सासरच्या मंडळींना हुंडा दिला होता. सासरची मंडळी आणखी हुंड्याची मागणी करीत होते.
इतर बातम्या
Join Whatsapp Group