कुठे हुंडाबळी तर कुठे एकतर्फी प्रेम तर कुठे अनैतिक संबंध यामुळे महिलांच्या हत्येचे प्रमाण वाढले आहे. केरळमध्ये अनैतिक संबंधातून महिलेची क्रूर हत्या झाल्याचा प्रकार समोर आला आहे. म्हैसूर जिल्ह्यातील सालिगराम तालुक्यातल्या भेर्या गावात एका प्रियकराने त्याच्या २० वर्षीय प्रेयसीच्या तोंडात ज्वलनशील पदार्थ टाकून तिची हत्या केली.
हे ही वाचा
मृत रक्षिता हिचे लग्न केरळमधील एका मजुरासोबत झाले होते. पण तिचे बेट्टाडापुरा गावातील तिचा नातेवाईक सिद्धाराजू सोबत कथित अनैतिक संबंध होते. घटनेच्या दिवशी रक्षिता आणि सिद्धाराजू एका लॉजमध्ये थांबले होते. जिथे त्यांच्यात कोणत्यातरी गोष्टीवरून वाद झाला. त्यानंतर सिद्धाराजूने तिच्या तोंडात आधी ज्वलनशील पदार्थ टाकला आणि नंतर खाणींमध्ये जिलेटिनच्या कांड्या फोडण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ट्रिगरने तो पदार्थ फोडून तिची हत्या केली.
हे ही वाचा
हत्या केल्यानंतर सिद्धाराजूने पळून जाण्याचा प्रयत्न केला पण त्याला स्थानिकांनी पकडले आणि पोलिसांच्या ताब्यात दिले. आरोपीने खोटा दावा करून पोलिसांची दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला. त्याने सांगितले की महिलेचा मृत्यू मोबाईल फोनच्या स्फोटामुळे झाला. मात्र नंतर त्याने पोलिसांना संपूर्ण सत्य सांगितले. पोलिसांनी आरोपी सिद्धाराजूला ताब्यात घेतले असून पुढील चौकशी सुरू आहे.