दुष्मनावरही येऊ नये इतकी वाईट वेळ एका कुटुंबावर आली आणि संपूर्ण कुटुंबाचीच जीवनयात्रा संपली. राजस्थानच्या उदयपूरममधून ही धक्कादायक घटना समोर आली आहे. उदयपूरमध्ये एका पतीने प्रथम पत्नी आणि दोन मुलांची हत्या केली. नंतर त्याने स्वतःही पंख्याला गळफास घेऊन आत्महत्या केली. घटनास्थळावरून एक सुसाईड नोटही सापडली असून ती वाचल्यावकर पोलिसदेखील सुन्न झाले.
मिळालेल्या माहितीनुसार, 40 वर्षीय दिलीप चितारा हे त्यांच्या कुटुंबासह अंबाफळा हॉल प्रभातनगर सेक्टर-5 मध्ये भाड्याच्या घरात राहत होते. त्यांच्यासोबत त्यांची पत्नी अलका (वय 37), मुलगा खुश (वय 6) आणि मनवीर (वय 4) रहात होते. दिलीपने प्रथम मुलांना विष दिले, पत्नीचा गळा दाबला आणि नंतर स्वतःला गळफास लावून घेतला. माहिती मिळताच हिरणमग्री पोलिस स्टेशन घटनास्थळी पोहोचले आणि त्यांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला. मात्र समोरच दिलीप चितारा यांचा मृतदेह फासावर लटकलेला होता, तर त्यांच्या पत्नी आणि मुलांचे मृतदेह तिथे पडले होते.
सुसाईड नोटमध्ये काय ?
दिलीपने सुसाईड नोटमध्ये लिहिलं होतं की,आर्थिक परिस्थिती खूप वाईट आहे. कोरोनानंतर आर्थिक परिस्थिती बिकट झाली. म्हणूनच तो हे पाऊल उचलत असल्याचंही त्याने नमूद केलं. दिलीपचे हिरणमग्री येथे एक जनरल स्टोअर होते. हे दुकानही भाड्याने घेतले होते असं पोलिसांनी सांगिीतलं.