दिवाळीसाठी गावाकडे निघाले पण वाटेतच जवानसह कुटुंबाचा जळून मृत्यू ; नक्की काय घडलं ?
दिवाळीसाठी गावाकडे निघाले पण वाटेतच जवानसह कुटुंबाचा जळून मृत्यू ; नक्की काय घडलं ?
img
वैष्णवी सांगळे
राजस्थानच्या जैसलमेरमध्ये एक हृदयद्रावक घटना घडली आहे. मंगळवारी दुपारी भरधाव एसी बसला अचानक भीषण आग लागली होती. बसला आग लागली त्यामधून प्रवास करणाऱ्या २१ प्रवाशांचा मृत्यू झाला तर १५ जण गंभीर जखमी झाले आहेत. जखमींवर जोधपूर येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. या घटनेमुळे दिवाळीपूर्वीच अनेक कुटुंब उद्ध्वस्त झाली. 


या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांमध्ये लष्कराचे जवान महेंद्र मेघवाल यांचा देखील समावेश आहे. ते दिवाळीच्या सुट्टीनिमित्त आपल्या कुटुंबीयांसोबत घरी जात होते. या दुर्घटनेत फक्त जवानाचा मृत्यू नाही झाला तर त्यांची पत्नी आणि ३ मुलांचा दुर्दैवी मृत्यू झाला. पाचही जण जिवंत जळाले. या घटनेमुळे मेघवाल कुटुंबीयांना मोठा धक्का बसला.

मिळालेल्या माहितीनुसार, ३५ वर्षीय महेंद्र मेघवाल थैयत गावाजवळ अचानक प्रवास करत असलेल्या बसला आग लागली आणि काही क्षणात संपूर्ण बस आगीत जळून खाक झाली. एसी बस असल्यामुळे आणि दरवाजे लॉक झाल्यामुळे कुणालाच बाहेर पडता आले नाही. बसमधील अनेक प्रवासी या आगीमध्ये जिवंत जळाले. यामध्ये जवानाच्या ५ जणांच्या कुटुंबातील सर्वजणांचा मृत्यू झाला. डीएनएन सॅम्पलद्वारे जवानाच्या कुटुंबीयांची ओळख पटवण्यात आली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group