जयपूर : राजस्थान विधानसभा निवडणुकीबाबत एक मोठी अपडेट समोर आली आहे. निवडणूक आयोगाने राजस्थानमधील विधानसभा निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. आता राजस्थानमध्ये २३ नोव्हेंबर ऐवजी २५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
दरम्यान, केंद्रीय निवडणूक आयोगाने राजस्थानसह पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांच्या तारखा जाहीर केल्या होत्या. राजस्थानमध्ये एका टप्प्यातील मतदानाची तारीख २३ नोव्हेंबर निश्चित करण्यात आली होती. परंतु, तारीख जाहीर झाल्यानंतर विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना आणि विविध माध्यमांनी निवडणुकीच्या तारखेबाबत केंद्रीय निवडणूक आयोगाकडे आपली मते मांडली होती.
निवडणूक आयोगाने राजस्थान निवडणुकीच्या तारखेत बदल केला आहे. यापूर्वी 23 नोव्हेंबर ही मतदानाची तारीख निश्चित करण्यात आली होती. आता यात बदल करण्यात आला आहे. आता 25 नोव्हेंबरला मतदान होणार आहे.
तारखेत बदल करण्याची मागणी विविध संघटनांकडून करण्यात आली होती. कारण देवउठनी एकादशी 23 तारखेला आहे आणि त्या दिवशी येथे मोठ्या प्रमाणात विवाह होऊ शकतात. हे लक्षात घेऊन तारखा बदलण्यात आल्या आहेत.