".... म्हणून पती अन् सासरच्या मंडळींकडून छळ" ; हेल्थ ऑफिसर महिलेनं घरातच आयुष्य संपवलं ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
पुण्यातील हगवणे प्रकरण ताजे असतानाच अमरावतीतून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. एका विवाहितेने पती आणि सासरच्या लोकांच्या छळाला कंटाळून आपलं आयुष्य संपवलं आहे. महिलेनं आपल्या राहत्या घरातच पाळण्याच्या दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची माहिती समोर आली आहे.

या प्रकरणी पोलिसांनी पती, सासू - सासऱ्यासह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. यापैकी तिघांना अटक केली आहे. ही घटना, अमरावती शहरातील गाडगे नगर पोलीस स्टेशन हद्दीतील जय भोले कॉलनीत घडली.

मिळालेल्या माहितीनुसार ,  शुभांगी तायवाडे (वय वर्ष ३०) असे मृत विवाहितेचे नाव आहे. शुभांगी या आरोग्य विभागात कम्युनिटी हेल्थ ऑफिसर पदावर कार्यरत होत्या, तर त्यांचे पती निलेश तायवाडे हे सेंट्रल बँक ऑफ इंडिया मध्ये वरिष्ठ व्यवस्थापक पदावर कार्यरत आहेत. गेल्या काही महिन्यांपासून शुभांगीला सासरच्या मंडळींकडून मानसिक आणि शारीरिक छळ केला जात असल्याचा आरोप आहे.


दुसरी मुलगी झाली म्हणून पती आणि सासरच्या मंडळींनी मिळून शुभांगीचा छळ केला जात होता, असा आरोप शुभांगीच्या आई वडिलांनी केला. शुभांगीच्या वडिलांनी आरोप केला आहे की, त्यांच्या मुलीचा पती निलेश आणि सासरच्या इतर सदस्यांनी तिचा मानसिक आणि शारीरिक छळ केला. त्यामुळेच तिने आत्महत्या केली असल्याचं त्यांनी सांगितलं. 

या प्रकरणानंतर शुभांगीच्या आई वडिलांनी पोलीस ठाण्यात धाव घेत सासरच्या मंडळींविरोधात तक्रार दाखल केली. गाडगे नगर पोलिसांनी निलेश तायवाडे आणि त्यांच्या सासू-सासऱ्यांसह पाच जणांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. त्यापैकी तिघांना अटक करण्यात आली आहे. या प्रकरणी शुभांगीच्या कुटुंबीयांनी दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group