देशात लोकसभा निवडणुकीची जोरदार तयारी सुरू आहे. प्रचारासाठी सर्व पक्षांच्या नेत्यांचे दौरे सुरू आहेत, काँग्रेस नेते राहुल गांधी आज तामिळनाडू दौऱ्यावर आहेत. निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी आज त्यांच्या हलिकॉप्टरची तपासणी केली. याबाबतचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
आज राहुल गांधी यांच्या हेलिकॉप्टरची राज्यातील निलगिरीमध्ये आयोगाच्या फ्लाइंग स्क्वॉडच्या अधिकाऱ्यांनी तपासणी केली आहे. हेलिकॉप्टरमधून गांधी उतरताच आयोगाचे अधिकारी पोहोचल्याचे दिसत आहेत, या व्हिडीओत राहुल गांधी हेलिकॉप्टरमधून उतरल्याचे दिसत आहेत. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रचारासाठी राहुल गांधी तामिळनाडूतून केरळला गेले आहेत.
काँग्रेस नेते राहुल गांधी सोमवारी कोझिकोड येथे पोहोचतील, जिथे ते निवडणूक रॅलीला संबोधित करतील आणि मंगळवारी १६ एप्रिल रोजी वायनाडला भेट देतील. त्यानंतर ते गुरुवारी कन्नूर, पलक्कड आणि कोट्टायममध्ये प्रचार करतील. ते त्रिशूर, तिरुअनंतपुरम आणि अलप्पुझालाही भेट देतील.