DGP चे महिलांशी अश्लील चाळे ! डीजीपी रामचंद्र राव निलंबित
DGP चे महिलांशी अश्लील चाळे ! डीजीपी रामचंद्र राव निलंबित
img
वैष्णवी सांगळे
नागरिकांच्या सुरक्षेची जबाबदारी पोलिसांची असते. पण अनेक ठिकाणी रक्षकच भक्षक झाल्याचं समोर आलं आहे. कर्नाटकामधील एका व्हिडीओने सर्वत्रच खळबळ माजवली आहे. अनेक महिलांसोबत आक्षेपार्ह वर्तन करतान IPS अधिकाऱ्याचा व्हिडीओ व्हायरल झाला आहे.  IPS रामचंद्र राव यांच्या व्हिडीओने चांगलीच खळबळ उडाली आहे. याप्रकरणी आता कर्नाटकचे डीजीपी आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी रामचंद्र राव यांना निलंबित करण्यात आले आहे.

नाशिक शहरात तोतया पोलिसांचा धुडगूस; दोन महिलांचे दागिने केले लंपास

सोशल मीडियावर त्यांचे आक्षेपार्ह व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही कारवाई करण्यात आली आहे. रामचंद्र राव हे कर्नाटकात डीजीपी या पदावर कार्यरत होते. काल सोशल मीडियावर अनेक व्हिडिओ क्लिप व्हायरल झाल्या, ज्यामध्ये रामचंद्र राव वेगवेगळ्या महिलांसोबत अश्‍लील कृत्य करताना दिसत होते. 

व्हिडिओ समोर येताच प्रशासकीय आणि राजकीय वर्तुळात खळबळ उडाली. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेऊन राज्य सरकारने तातडीने राव यांना निलंबित करण्याचा निर्णय घेतला; मात्र रामचंद्र राव यांनी हे सर्व आरोप स्पष्टपणे फेटाळून लावले आहेत. हे व्हिडिओ पूर्णपणे बनावट आणि खोटे असल्याचे त्यांनी म्हटले आहे. सध्या याची जोरदार चर्चा रंगली आहे.

कर्नाटकचे गृहमंत्री जी. परमेश्‍वर यांच्या घराबाहेर प्रसारमाध्यमांशी बोलताना राव म्हणाले, की मला या प्रकारामुळे मोठा धक्का बसला आहे. माझा व्हिडिओशी कोणताही संबंध नाही. आजच्या काळात कोणाचाही बनावट व्हिडिओ तयार केला जाऊ शकतो आणि हा आपली प्रतिमा मलिन करण्याचा कट असू शकतो, असेही त्यांनी नमूद केले. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर राव यांनी कर्नाटकच्या गृहमंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला; पण त्यांची भेट होऊ शकली नाही. सरकारने या संपूर्ण प्रकरणाची चौकशी करण्याचे संकेत दिले असून, चौकशी अहवालाच्या आधारे पुढील कारवाई केली जाईल. 

रामचंद्र राव यांची मुलगी रान्या रावला या आधी सोन्याच्या तस्करी प्रकरणात अटक करण्यात आली आहे. कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांनी चौकशीचे आदेश दिले आहेत. हा वाद गांभीर्याने घेत मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी कडक कारवाईचे आश्‍वासन दिले आहे. आम्ही या प्रकरणाची चौकशी करू. मला याची माहिती मिळाली. व्यक्ती कोणत्याही पदावर असली, तरी कायदा सर्वांसाठी समान आहे. आम्ही चौकशी करू आणि त्यानंतरच पुढील पावले उचलली जातील असे म्हटले आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group