बांधकामांच्या ठिकाणी दिसणाऱ्या 'त्या' गूढ महिलेचे सोशल मीडियाने सोडवले 'कोडे'
बांधकामांच्या ठिकाणी दिसणाऱ्या 'त्या' गूढ महिलेचे सोशल मीडियाने सोडवले 'कोडे'
img
वैष्णवी सांगळे
कर्नाटकातील रस्ते एका वेगळ्याच चर्चेने गाजत आहेत. बांधकामांच्या इमारतींवर एका मोठ्या डोळ्यांच्या 'गूढ' महिलेचे पोस्टर सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे. ही महिला नेमकी कोण, असा प्रश्न सर्वांना पडला असतानाच आता सोशल मीडियाने या 'मिस्टरी वुमन'चे कोडे अखेर सोडवले आहे.

कर्नाटक प्रवासादरम्यान एक तरुणीस एक गोष्ट निदर्शनास आली. येथील नवीन इमारतींचे बांधकाम सुरू होते, तिथे एका साडी नेसलेल्या आणि डोळे मोठे करून पाहणाऱ्या महिलेचा फोटो लावलेला दिसत होता. तिने ५ जानेवारी २०२६ रोजी 'एक्‍स' या सोशल मीडियावर हा फोटो शेअर करत विचारले, "ही महिला कोण आहे? ही मला कर्नाटकभर बांधकामाच्या ठिकाणी का दिसते?" असे सवाल तिने केला. 

सुरुवातीला अनेक नेटकऱ्यांनी यावर विविध तर्कवितर्क लढवले. काहींनी याला वाईट नजरेपासून वाचवणारे कवच म्हटले, तर काहींनी मजेशीरपणे ही चोरांना घाबरवण्यासाठी लावलेली प्रतिमा असल्याचे सांगितले एका 'X' युजरने एआय (AI) प्लॅटफॉर्मच्या मदतीने या महिलेची ओळख पटवली आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार, ती महिला कर्नाटकातील एक प्रसिद्ध युट्युबर निहारिका राव आहे. २०२३ मध्ये तिच्या एका व्हिडिओमधील 'आश्चर्यचकित झालेली' एक्सप्रेशन असलेला फोटो सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला होता. स्थानिक लोकांनी तिच्या या मिम्सचा वापर करून त्याला 'दृष्टी गोम्बे' (वाईट नजर काढणारी बाहुली) म्हणून वापरण्यास सुरुवात केली. पारंपारिकपणे, बांधकामाच्या ठिकाणी अशी बाहुली लावली जातात. मात्र, आता निहारिका रावचा हा फोटो एक नवीन ट्रेंड बनला असून, चक्क 'मीम'चा वापर वाईट नजरेपासून वाचण्यासाठी केला जात असल्याचे पाहून नेटकरी आश्चर्य व्यक्त करत आहेत.
इतर बातम्या
Join Whatsapp Group