पैशांना हपापलेल्या बापाचं संतापजनक आणि लाजिरवाणं कृत्य समोर आलं आहे. पैशांच्या मोहात बुडालेल्या नराधम पित्याने स्वतःच्या लेकीचा सौदा केलाय. ही संतापजनक घटना कर्नाटकातील चिक्कमगलुरु जिल्ह्यातील बिरूर येथे घडली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पीडित अल्पवयीन मुलीच्या आईचे काही दिवसांपूर्वी निधन झाले होते. त्यानंतर ती आपल्या नातेवाईकांकडे राहून अभ्यास करत होती. १२वी चे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती आपल्या वडिलांकडे परत आली मात्र इथेच तिची मोठी चूक झाली. घरी परतल्यानंतर तिच्यासोबत जो प्रसंग घडला त्याने कोणाच्याही डोळ्यात अश्रूंचा बांध फुटेल.
डिसेंबर महिन्यात नराधम पिता मुलीसह आजीकडे गेला. तेथे दोन दिवस ते थांबले. दरम्यान पैशासाठी आजी आणि वडिलांनी मिळून मुलीला विकण्यासाठी व्यवहार केला. याच दरम्यान भरत शेट्टी नावाचा एक व्यक्ती तेथे पोहोचला, ज्याने पीडितेच्या वडिलांना मोह दाखवला की जर मुलगी या धंद्यात आली तर ती रोज ५ हजार रुपये कमावू शकते. याचं वाक्याला भुललेल्या नराधम बापाने आपल्याच लेकराचा सौदा केला.त्यांनतर पीडितेला मंगळूर येथे घेऊन जाण्यात आले.
प्रवासात लेकीने वडिलांना मासिक पाळी आली असून तिची तब्बेत ठीक नसल्याचं सांगितलं. मात्र दगडाच्या काळीज असणाऱ्या त्या बापाला जरा देखील पाझर फुटला नाही. त्याने तरीही मुलीला २० ते ४५ वर्षे वयाच्या चार पुरुषांसोबत संबंध ठेवण्यास भाग पाडलं. मुलीने विरोध केल्यानंतरही तिचे वारंवार लैंगिक शोषण करण्यात आले.सलग दोन तीन दिवस उलटून गेल्यानंतर तरुणीने हिंमत एकवटून पोलीस ठाण्यात धाव घेतली. घडलेला सगळा प्रकार पोलिसांना सांगितला.
पीडित मुलीच्या जबाबानुसार पोलिसांनी नराधम बापासह १२ जणांना ताब्यात घेतले. तपासात समोर आले आहे की भरत शेट्टी दक्षिण कन्नड जिल्ह्यात देह व्यापाराचे मोठे नेटवर्क चालवतो. त्याच्यावर मंगळुरु आणि उडुपीमध्ये यापूर्वीच वेश्यावृत्तीचे ८ पेक्षा जास्त गुन्हे दाखल आहेत. पोलिस आता या टोळीशी संबंधित इतर लोकांच्या शोधात छापेमारी करत आहेत. घडलेल्या या घटनेने अनेकांकडून संताप व्यक्त करण्यात येतोय.