आधी पती गायब मग पत्नी गायब त्यानंतर प्रियकर गायब, ही घटना तुम्हालाही चक्रावून सोडेल, नेमकं काय घडलं ?
आधी पती गायब मग पत्नी गायब त्यानंतर प्रियकर गायब, ही घटना तुम्हालाही चक्रावून सोडेल, नेमकं काय घडलं ?
img
Vaishnavi Sangale
दृश्यम चित्रपट हा सर्वांनीच पाहिला आहे. अभिनय, लेखन, दिग्दर्शन सर्वच अंगावर शहारे आणणारे होते. पण ही कथा सत्य नव्हती तर काल्पनिक होती.  आता या चित्रपटाच्या कथेला सत्यात उतरवलं आहे नालासोपाऱ्यातील एका प्रेमी युगुलाने. दृश्यम स्टाईलने पतीचीच हत्या या महिलेने केली आहे. महिलेेने प्रियकराच्या मदतीने चक्क तिच्याच पतीची हत्या करून मृतदहे घरातील जमिनीत गाडल्याची घटना सोमवारी सकाळी उघडकीस आली आहे.

नालासोपारा येथे उघडकीस आलेल्या हत्येच्या घटनेत विजय चव्हाण (वय ३५) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. दरम्यान विजय हा मागील १५ दिवसांपासून बेपत्ता होता. यामुळे बिलालपाडा येथे राहणारे विजय चव्हाण याचे दोन भाऊ त्याचा शोध घेत होते. मात्र तो आढळून आला नाही. याच दरम्यान दोन दिवसांपूर्वी विजयची पत्नी कोमल चव्हाण हि देखील बेपत्ता झाली होती. यामुळे परिवार अधिक गोंधळून गेला होता. 

कोमल बेपत्ता झाल्यानंतर तिच्या पाठोपाठ शेजारी राहणारा मोनू शर्मा हा तरुण देखील बेपत्ता झाला होता. कोमल चव्हाण आणि मोनू शर्मा यांच्यात प्रेमसंबंध होते आणि त्यातून ते दोघे पळून गेल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे. सोमवारी सकाळी विजय चव्हाण यांचे दोन्ही भाऊ गडगापाडा येथील ओम साई या निवासस्थानी आले. यावेळी घरातील टाईल्सचे रंग वेगळे असल्याचे दिसून आले. यानंतर त्यांनी टाईल्स खोदून काढली असता याठिकाणाहून दुर्गंधी येऊ लागली. यानंतर त्यांनी तात्काळ पोलिसांना बोलावले. सध्या पेल्हार पोलीस घटनास्थळी असून लाद्या काढून मृतदेह शोधण्याचे काम सुरू आहे. तसेच कोमल आणि तिच्या प्रियकर मोनू यांचाही शोध पोलीस घेत आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group