अबब...! प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी युवकाने चक्क सात रिक्षा चोरल्या ; कुठे घडली घटना?
अबब...! प्रेयसीचे लाड पुरविण्यासाठी युवकाने चक्क सात रिक्षा चोरल्या ; कुठे घडली घटना?
img
Dipali Ghadwaje
नालासोपारा : प्रेमात आकांत बुडालेल्या युवकाने आपल्या प्रेयसीचे लाड पुरवण्यासाठी काहीही करण्याची तयारी दर्शविली. प्रेयसीला चांगले गिफ्ट देण्यासाठी तसेच ती काही मागत असेल तर तिचा हट्ट पुरविण्यासाठी युवकाने हद्दच पार केली. शहरात फिरताना तब्बल सात रिक्षा, एक स्कूटर आणि एक मोबाईल चोरी केल्याचे समोर आले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , चोरी करणाऱ्या या युवकाला आचोळे पोलिसांनी अटक केली आहे. आचोळे पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या शशिकांत कामनोर (वय २४) असे या तरुणाचे नाव आहे. तो मुंबई व उपनगरातील विविध भागांतून वाहनांची चोरी करत होता. शशिकांत हा मूळचा मालाडचा असून त्याची प्रेयसी नालासोपारा आचोळे परिसरात राहत होता.

तिच्यावर छाप पाडण्यासाठी आणि तिचे खर्च भागवण्यासाठी शशिकांतने अनोखा मार्ग अवलंबला होता. पोलिसांनी विविध तक्रारींचा छडा लावत शशिकांतला ताब्यात घेतले आहे.

रिक्षा चोरी करून करायचा प्रवासी वाहतूक मुंबईतील रिक्षा चोरून तो त्या रिक्षांचा प्रवासी वाहतुकीसाठी वापर करायचा. रिक्षा चालवून मिळणाऱ्या पैशातून तो गर्लफ्रेंडचे हट्ट पुरवायचा.

मात्र, रिक्षाचे पेट्रोल किंवा सीएनजी संपल्यावर तो त्या रिक्षा तिथेच सोडून द्यायचा. त्याने मुख्यतः आचोळे, विरार, देवनार, अंधेरी, बांद्रा आणि एमएचबी या पोलीस ठाण्यांच्या हद्दीतून चोरी केल्या होत्या. यातील आचोळे पोलीस ठाणे २, विरार १, देवनार १, अंधेरी १, बांद्रा २ आणि एमएचबी १ अशा एकूण ८ गुन्ह्यांची नोंद करण्यात आली आहे.

सर्व वाहने व मोबाईल केला जप्त चोरीच्या तक्रारी दाखल झाल्यानंतर पोलिसांनी तपास केला असता शशिकांत यास ताब्यात घेतले आहे.

दरम्यान शशिकांतच्या मुसक्या आवळल्यानंतर पोलिसांनी त्याच्याकडून सर्व चोरी केलेली वाहने आणि मोबाईल हस्तगत केला आहे.

सध्या या प्रकरणाचा अधिक तपास आचोळे पोलीस करत असून त्याच्याकडून आणखी काही चोऱ्यांचा उलगडा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group