पतीची हत्या करून गायब असलेली पत्नी आणि तिचा प्रियकर सापडला, तपासात धक्कादायक माहिती समोर
पतीची हत्या करून गायब असलेली पत्नी आणि तिचा प्रियकर सापडला, तपासात धक्कादायक माहिती समोर
img
Vaishnavi Sangale
नालासोपारामध्ये पत्नी आणि तिच्या प्रियकराने पतीची हत्या केल्याच्या प्रकरणात पोलीस तपासात अनेक बाबी समोर आल्या आहेत. 19 तारखेला कोमल आणि मोनू हे दोघं विजयची हत्या करून आधी नालासोपारा स्टेशनवर गेले. जिथे त्यांच्यासोबत कोमलचा 5 वर्षांचा मुलगाही होता. तिघांनी नालासोपारा स्टेशनवरून ट्रेन पकडून दादर गाठले. दादरहून ते बसने पुण्याला रवाना झाले. पुण्यामध्ये ते काही दिवस एका घरात बेकायदेशीरपणे राहत होते, अशी माहिती समोर आली आहे

मृत विजयच्या फोनमधून सिमकार्ड काढून ते स्वतःच्या फोनमध्ये आरोपींनी टाकले होते. ज्याचा उद्देश बँक ट्रान्झॅक्शनसाठी ओटीपी तयार करणे हा होता. जेव्हा आरोपी येथून पळून गेले, तेव्हापासून त्यांचे फोन बंद होते, परंतु पुण्याला जाऊन ट्रान्झॅक्शन करण्यासाठी ओटीपी पुन्हा तयार करण्यात आला. पोलिसांनी त्या ओटीपीच्या मेसेजवरून पुण्यातील ठिकाण शोधले आणि आरोपींना पकडले.

या प्रकरणाची माहिती जाणून घेण्यासाठी खालील बातमी वाचा 

 विजयच्या घरातील फरशा त्याच्या मोठ्या भावाने, अजयनेच बदलल्या होत्या. ही माहिती विजयच्या भावाने, अजयनेच पोलिसांना दिली आहे, परंतु त्याला याची कल्पना नव्हती की ज्या फरशा बदलल्या जात आहेत, त्याखाली त्याच्या भावाचा मृतदेह पुरला आहे आहे
इतर बातम्या
Join Whatsapp Group