दुर्दैवी : 27 वर्षीय बॉडीबिल्डरचा हृदयविकाराने  मृत्यू
दुर्दैवी : 27 वर्षीय बॉडीबिल्डरचा हृदयविकाराने मृत्यू
img
DB
नालासोपारा : नालासोपाऱ्यातुन एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील  27 वर्षाच्या एका बॉडी बिल्डरचा हृदयविकाराच्या झटक्याने  मृत्यू झाला आहे. अजिंक्य कदम असे 27 वर्षीय बॉडी बिल्डर तरुणाचे नाव आहे.

याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, अजिंक्य कदम हा नालासोपारा पूर्व मोरे गाव आरंभ कॉलनीमध्ये राहत होता. सोमवारी (04 सप्टेंबर) सकाळी अचानक त्याला अस्वस्थ वाटत असल्याने त्याला जवळच्या महापालिकेच्या रुग्णालयात दाखल केले असता. तिथल्या डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.

अविवाहित असलेल्या अजिंक्यने 75 kg वजनात आपल्या बॉडी बिल्डिंगच्या माध्यमातून, पालघर जिल्ह्यात विविध पारितोषिक मिळवली होती. त्याच्या पश्चात आई, वडील, तीन भाऊ आणि एक बहीण असून मुलांमध्ये घरात तो मोठा होता. अचानक त्याच्या जाण्याने कदम कुटुंबासह मित्रपरिवारवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group