अभिनेता श्रेयस तळपदेला गुरुवारी रात्री हृदयविकाराचा झटका आल्याची बातमी समोर आली. या बातमीनंतर अनेक चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला होता. नुकतीच मराठी आणि बॉलिवूड अभिनेता श्रेयस तळपदेच्या प्रकृतीबाबत महत्वाची अपडेट समोर आली आहे. या अपडेटनंतर चाहत्यांचा जीव भांड्यात पडला आहे. श्रेयसची प्रकृती आता स्थिर आहे. मुंबईतील अंधेरी येथील बेलेव्ह्यू रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अँजिओप्लास्टी झाली आहे. तो ठणठणीत बरा व्हावा यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत. तत्पूर्वी त्याच्या प्रकृतीबाबत पत्नी दीप्ती तळपदेने माहिती दिली होती. आता डॉक्टरांनी त्याच्या प्रकृतीबाबत अपडेट दिली आहे.
गुरुवारी १४ डिसेंबरला श्रेयस तळपदे याला हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर तो बेशुद्ध पडला होता. त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याची अँजिओप्लास्टी झाली होती. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत आहे. डॉक्टरांच्या माहितीनुसार, श्रेयस तळपदेला एक-दोन दिवसांत डिस्चार्ज मिळणार आहे. प्रकृती सुधारत आहे.