अभिनेता श्रेयस तळपदेबाबत एक मोठी बातमी समोर येत आहे. श्रेयसविरोधात एका प्रकरणात FIR दाखल करण्यात आला आहे. एका घोटाळ्यासंबंधी प्रकरणात श्रेयसविरोधात हरीयाणामधील सोनीपत येथे FIR दाखल केला गेला आहे. श्रेयससोबतच प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता आलोकनाथ यांचं नावंही FIR मध्ये आहे.
नेमकं प्रकरण काय?
इंदोरमधील एका कंपनीने ५० लाखांहून अधिक लोकांचे कोट्यवधी रुपये घेत पळ काढला आहे. या कंपनीत गुंतवणूक करण्यासाठी श्रेयस आणि आलोकनाथ यांनी जाहिरात केली होती. त्यामुळे त्यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे.
या कंपनीमध्ये जवळपास ६ वर्षांपासून लोकांनी गुंतवणूक केली होती. चांगल्या परतावा मिळेल असं आमिष दाखवून लोकांना गुंतवणूक करण्यास सांगितल्याचं तक्रारीत म्हटलं आहे. अनेक मोठ्या हॉटेलमध्ये सेमिनार ठेवून या कंपनीत लोकांना एजेंट बनवून घेतलं गेलं. सुरुवातीला काही लोकांना कंपनीने पैसेदेखील दिले. मात्र त्यानंतर पैसे देण्यास कारणे सांगितली जाऊ लागली.
पैसे न दिल्याने नागरिकांनी फसवणुकीचा दावा करण्यास सुरुवात अधिकाऱ्यांनी त्यांचे मोबाईल बंद केले. त्यामुळे लोकांनी थेट कंपनीच्या ऑफिसात धाव घेतली.
मात्र ऑफिसला टाळं असल्याचं दिसून आलं. पोलिसांत दाखल करण्यात आलेल्या FIR मध्ये श्रेयस तळपदे आणि आलोकनाथ यांच्यासह ११ जणांची नावे आहेत. या मार्केटिंग कंपनीचं प्रमोशन श्रेयस तळपदेनेही केलं होतं. या प्रकरणी पंजाब आणि हरीयाणा हायकोर्टात याचिका दाखल करण्यात आली आहे. २५ जानेवारीला या प्रकरणाची सुनावणी होणार आहे.