मुंबई : ड्रग्ज केसमुळं अनेकदा वादात अडलेला एजाज खान पुन्हा चर्चेत आलाय. नुकतीच त्यानं विधानसभा निवढणूक लढवली होती. पण आता धक्कादायक बाब समोर आली आहे. एजाज खानच्या पत्नीला पोलिसांनी ड्रग्ज प्रकरणात ताब्यात घेतल्याची माहिती आहे.
बिग बॉस फेन अभिनेता एजाज खान नेहमीच वेगवेगळ्या कारणांमुळे चर्चेत असतो. एजाज खानचे इन्स्टाग्रावर लाखोंनी फॉलोअर्स आहेत मात्र निवडणुकीत 500 पेक्षा कमी मत मिळाली. एजाज नेहमीच कोणत्यातरी कारणामुळे वादाचे कारण बनतो. सध्या तो त्याच्या पत्नीमुळे चर्चेत आला आहे. एजाजची पत्नी फेलॉन गुलीवाला यांना ड्रग्जच्या एका प्रकरणात अटक करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, गुलीवाला यांच्या स्टाफमधील एका सदस्याने कुरिअरद्वारे 100 ग्रॅम मेफेड्रोन (एमडीएमए) मागवले होते. या प्रकरणात एजाजच्या स्टाफमधील सदस्याला एका महिन्यापूर्वी अटक करण्यात आली होती. त्यानंतर आता गुलीवाला यांना अटक करण्यात आली आहे. एजाज खान यांची पत्नी फेलॉन या परदेशी आहेत. एका ड्रग्ज तस्करी प्रकरणात 8 ऑक्टोबर रोजी त्यांचे नाव समोर आले होते.
कस्टम विभागाने ड्रग्ज असलेल्या कुरिअरला ट्रॅक करून एजाजचा पियून सुरज गौड याला अटक केलं होतं. एजाज खान याचे अंधेरीत एक कार्यालय आहे. याच कार्यालयात कुरिअर करण्यात आलेले ड्रग्ज पाठवले जाणार होते.
कस्टम विभागाने बुधवारी फेलॉन यांना त्यांच्या जोगेश्वरी स्थित येथील निवासस्थानी छापेमारी केली. या छापेमारीत वेगवेगळ्या प्रकारचे ड्रग्ज जप्त करण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली.
कोण हे एजाज खान?
गुजरातच्या अहमदाबाद इथं २९ मे १९८१ रोजी जन्मलेल्या एजाज खाननं टीव्ही विश्वातून अभिनय क्षेत्रात पाऊल टाकलं. २००७ मध्ये आलेली टीव्ही मालिका 'क्या होगा निम्बो का'मधून त्यानं अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं होतं.