सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
सैफ अली खानवर झालेल्या हल्ला प्रकरणातील मुख्य आरोपीला 5 दिवसांची पोलिस कोठडी
img
दैनिक भ्रमर
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खानवर जीवघेणा हल्ला करण्यात आला होता. या प्रकरणाने संपूर्ण बॉलीवूड सह देशभरात ही  हे प्रकरण गाजतंय. गेल्या चार दिवसांपासून पोलिस या प्रकरणाची कसून तपास करत असून आता पर्यंत ५० हून अधिक लोकांची चौकशी केली असून या प्रकरणात दरदिवशी या  नवनवीन खुलासे होत आहेत.दरम्यान,  शनिवारी मध्यरात्री दोनच्या सुमारास ठाण्याहून एकाला अटक केली आहे.

मुंबई पोलिसांनी सैफच्या मुख्य आरोपीला ताब्यात घेतलं आहे. मुंबई पोलिसांनी आज सकाळी ९ वाजता पत्रकार परिषद घेत अनेक महत्वाचे खुलासे केले आहे. रात्री २ वाजण्याच्या सुमारास आरोपीला अटक करण्यात आली. आरोपीला पकडण्यासाठी सुमारे १०० अधिकाऱ्यांची एक टीम तयार करण्यात आली होती. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) आहे. हा आरोपी बांग्लादेशी ओरीजनचा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार , सैफवर हल्ला करणाऱ्या आरोपीचं नाव मोहम्मद शरीफउल इस्लाम शहजाद (वय 30) आहे. आरोपी नाव बदलून पोलिसांना चकमा देत होता. मात्र त्याच्याकडे भारतीय असल्याचे कुठलीच कागदपत्रे नाहीत. त्यामुळे पोलिसांना संशय आहे की तो बांगलादेशी असावा. अद्याप याविषयी काही स्पष्टता नसून चौकशी सुरू आहे.  अटकेनंतर आता हल्लेखोरालाही न्यायालयात हजर केले जाणार असून, सध्या रुग्णालयात दाखल असलेल्या सैफ अली खानचाही जबाब पोलीस नोंदवणार आहेत. दरम्यान, या आरोपीला पाच दिवसांची पोलिस कोठडी देण्यात आली असून पोलिसांनी आरोपीला १४ दिवसांची कोठडी देण्याची मागणी केली आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group