सैफ अली खान हल्ला प्रकरणातील  पहिला आरोपी अटकेत
सैफ अली खान हल्ला प्रकरणातील पहिला आरोपी अटकेत
img
दैनिक भ्रमर
बॉलीवूड अभिनेता सैफ अली खान याच्यावर हल्ला झाला आहे. वांद्रे (पश्चिम) येथील त्याच्या घरात घुसून एका दरोडेखोराने त्याच्यावर हल्ला केला. या हल्ल्यात तो जखमी झाला आहे. गुरुवारी मध्यरात्री 3 वाजेच्या सुमारास तो त्याच्या कुटुंबियांसह घरात झोपला असताना ही घटना घडली.दरम्यान या प्रकरणात आता पोलिसांना मोठं यश मिळालं आहे.  सैफ अली खान यांच्यावर हल्ला झालेल्य़ा प्रकरणात एका आरोपीला अटक करण्यात यश आलं आहे. 

मिळालेल्या माहितीनुसार  कोणत्याही क्षणी पोलीस आरोपीला घेऊन येणार आहेत. तसेच आरोपीला बांद्रा पोलिस स्टेशनमध्ये हजर केले जाऊ शकते. दरम्यान या प्रकरणात सैफवर तीन जणांनी हल्ले केले होते. यातील एकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. तर इतर दोन आरोपी अद्याप फरार आहेत.पोलीस त्यांच्या मागावर आहेत.

सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, आरोपी चोरटा हा लोकल ट्रेनने वांद्रयात आल्याची माहिती आहे.त्यानंतर इमारतीच्या नजीक पोहोचल्यानंतर त्याने दुसऱ्या एका इमारतीत शिरूर सैफच्या इमारतीत शिरकाव केल्याची माहिती सुत्रांकडून मिळतेय.अशाप्रकारे तो सैफच्या इमारतीत शिरला होता.

इमारतीत जरी चोरटा शिरला असला तरी त्या ठिकाणी कडेकोट सुरक्षा आहे. इमारतीच्या लिफ्टमधून प्रवास करायलाही अॅक्सेस कार्डचा वापर करावा लागतो. त्यात इमारतीच्या प्रत्येक कानाकोपऱ्यात सीसीटीव्ही आहेत. त्यामुळे सहजासहजी इमारतीच्या आत शिरणे सोप्पे नाही आहे. मात्र चोरट्याने सैफच्या घरात शिरण्यासाठी इमर्जन्सी पायऱ्यांचा वापर केला होता, अशाप्रकारे हा चोरटा सैफचा घरात शिरला आहे

दरम्यान , सैफ अली खानच्या घरात तीन हल्लेखोर शिरले होते. यापैकी एका हल्लेखोराला अटक करण्यात पोलिसांना यश आले आहे. तर अद्याप दोन आरोपी फरार आहे.पोलीस या दोन आरोपींचा शोघ घेत आहे. या प्रकरणाचा अधिक तपास सूरू आहे.

इतर बातम्या
Join Whatsapp Group