"कदाचित त्या दिवशी आयुष्यात येऊन मला...." ; श्री स्वामी समर्थांसाठी केदार शिंदेंची खास पोस्ट
img
Dipali Ghadwaje
श्री स्वामी समर्थांचा महिमा अनेकदा आपण त्यांच्या भक्तांकडून ऐकतो. 'भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे...'  , असं म्हणणारे स्वामी समर्थ भक्तांना कधीच एकटं सोडत नाहीत, त्यांच्या अडीनडीच्या काळात ते भक्तांसमोर ढाल बनून उभे राहतात, अशी अनेकांची धारणा आहे. फिल्म इंडस्ट्रीतही  श्री स्वामी समर्थांचे अनेक भक्त आहेत. 

काही दिवसांपूर्वीच एका बॉलिवूड अभिनेत्याच्या घरी श्री स्वामी समर्थांच्या पादुकांचं पूजन करण्यात आलं. अभिनेत्यानं याबाबत एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

यासोबतच इतरही अनेक सेलिब्रिटींनी मुलाखतींमध्ये श्री स्वामी समर्थांच्या कृपेचे किंवा समर्थांच्या दृष्टांतांचे अनेक किस्से ऐकवले आहेत. अशातच आता मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी सोशल मीडियावर केलेली समर्थांची एक पोस्ट व्हायरल होत आहे. 

सिनेसृष्टीतील अनेक सेलिब्रिटी मोठ्या भक्तीभावानं श्री स्वामी समर्थांची सेवा करतात. अशातच दिग्दर्शक केदार शिंदे यांनीही सोशल मीडियावर स्वामींच्या महतीची एक पोस्ट शेअर केली आहे. 

सोशल मीडियावर शेअर केलेल्या पोस्टमध्ये काय म्हणाले केदार शिंदे? 

मराठी दिग्दर्शक केदार शिंदे यांनी पोस्टमध्ये लिहिलंय की, "श्री स्वामी समर्थ महाराज की जय. 1997 रोजी तुम्ही माझ्या आयुष्यात आलात. तोवर मला ठाऊक नव्हतं तुमच्याविषयी. कारण आमच्या घराण्यात कुणीही तुमची सेवा, भक्ती केली नव्हती. ती संधी तुम्ही मला दिलीत. मार्ग दाखवला."

पुढे बोलताना केदार शिंदे म्हणाले की, "माझ्या आयुष्याला एक कलाटणी मिळाली. तुम्ही नसतात तर कदाचित मी नसतोच. कारण खुप स्थित्यंतर या वर्षात घडली. आज 28 वर्ष पूर्ण होतायत. श्वासाचा शेवट तुमच्या नामानेच व्हावा, हीच तुमच्या पायी प्रार्थना. आज व्यावसायिक रंगभूमीवर माझं गाजलेल नाटक 'आमच्या सारखे आम्हीच' यालाही 28 वर्ष पूर्ण झाली. कदाचित त्याच दिवशी आयुष्यात येऊन मला जाणीव करून दिलीत तुम्ही... आमच्या सारखे आम्हीच!" 
 

इतर बातम्या
Join Whatsapp Group