१७ महागड्या कार्स, ९५ कोटींची ज्वेलरी अन्.......जया बच्चन – अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती?
१७ महागड्या कार्स, ९५ कोटींची ज्वेलरी अन्.......जया बच्चन – अमिताभ बच्चन यांची एकूण संपत्ती किती?
img
Dipali Ghadwaje
चित्रपटसृष्टीतील दिग्गज अभिनेत्री आणि बिग बी अर्थात अमिताभ बच्चन यांची पत्नी , जया बच्चन या त्यांच्या कामासासोबत राजकीय कारकिर्दीसाठीदेखील ओळखल्या जातात. त्या आजही इंडस्ट्रीमध्ये सक्रिय आहेत. गेल्या अनेक दशकांपासून चित्रपटसृष्टीत कार्यरत असलेल्या जया बच्चन राजकारणातही अनेक वर्षांपासून आहेत.  

अमिताभ बच्चन यांची बॉलीवूडमधील क्रेझ काही वेगळीच आहे. वयाची ८० वर्ष पूर्ण केल्यानंतरही त्यांच्या नावाची महती काही कमी झालेली नाही. या वयातही ते तितक्याच जोमानं काम करताना दिसत आहेत. नवोदित कलाकारांनाही त्यांचा हेवा वाटावा असा परफॉर्मन्स बिग बी यांचा राहिला आहे. सध्या ते आणि त्यांची पत्नी जया बच्चन यांची वेगळी बातमी समोर आली आहे. त्यांनी बक्कळ पैसा कमवला आहे. त्यांची संपत्ती ऐकून तर तुम्हीही  थक्क व्हाल.

राज्यसभेच्या खासदार जया बच्चन यांनी त्यांच्या संपत्तीची घोषणा केली आहे. अमिताभ आणि जया बच्चन या दोन्ही सेलिब्रेटींचा चाहतावर्ग मोठा आहे. हे दोन्ही सेलिब्रेटी त्यांच्या वेगळेपणामुळे नेहमीच चाहत्यांचा अन् नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय राहिल्या आहेत.

आगामी काळातील राज्यसभेच्या निवडणूकीसाठी समाजवादी पार्टीकडून उमेदवारीसाठी नाव घोषित करण्यात आले आहे. जया बच्चन यांनी त्यांचे पती अमिताभ बच्चन यांच्यासह आपल्या संपत्तीची घोषणा केली असून त्यांची एकुण संपत्ती ही १ हजार ५७८ कोटींचे सांगण्यात येत आहे. त्यांना उत्तर प्रदेशमधून राज्यसभेसाठी पुन्हा एकदा उमेदवारी मिळाली आहे.  जया बच्चन यांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात संपत्तीचा उल्लेख केलाआहे. त्यात त्यांनी २०२२ - २०२३ या वर्षातील संपत्ती १.६३ कोटी रुपये सांगितली आहे.

त्याच वर्षी एकट्या अमिताभ बच्चन यांची संपत्ती ही २७३. ७४ कोटी रुपयांची असल्याचे दिसून आले आहे. त्या प्रतिज्ञापत्रात उल्लेख केल्यानुसार जया बच्चन यांच्या बँक अकाउंटमध्ये १०.११ कोटी रुपये आहे.  एका वृत्त वाहिनीने दिलेल्या माहितीनुसार  त्यांच्याकडे ४०.९७ कोटी रुपयांची ज्वेलरी असून ९.८२ लाख रुपयांची कार आहे.  अमिताभ यांच्याकडे ५४.७७ कोटींची ज्वेलरी आणि दोन मर्सिडिज असून एक रेंज रोव्हरसह आणखी १६ वेगवेगळ्या कार्स आहेत.  

 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group