वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी
वयाच्या अवघ्या 30 व्या वर्षी "या"प्रसिद्ध अभिनेत्रीचं निधन; सिने इंडस्ट्रीवर शोककळा
img
दैनिक भ्रमर



मुंबई : मनोरंजन विश्वातून अतिशय धक्कादायक बातमी समोर आली आहे. आपल्या मनमोहक अदांनी आणि अभिनयाने अवघ्या हरयाणाला वेड लावणारी अभिनेत्री दिव्यांका सिरोही हिचं वयाच्या अवघ्या ३० व्या वर्षी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झालं आहे.

मंगळवारी रात्री तिला राहत्या घरी त्रास जाणवू लागला. मात्र काही कळायच्या आतच तिची प्राणज्योत मालवली. दिव्यांकाच्या निधनाच्या बातमीनंतर आता इंडस्ट्रीवर शोककळा पसरली आहे.हरयाणवी मनोरंजन विश्वातील लोकप्रिय अभिनेत्री दिव्यांकाला तिच्या गाझियाबादमधील घरी अचानक अस्वस्थ वाटू लागलं. त्यानंतर तिला ताबडतोब जवळच्या रुग्णालयात हलवण्यात आलं.

तिला आलेला हृदयविकाराचा झटका इतका तीव्र होता की डॉक्टरांनी तिला उपचारादरम्यान मृत घोषित केलं. अवघ्या ३० व्या वर्षी अचानक मृत्यू ओढवणं चाहत्यांच्या आणि तिच्या सहकाऱ्यांच्या पचनी पडत नाही. गाझियाबादमध्ये तिच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. टिकटॉक'वर ५० लाखांहून अधिक फॉलोअर्स मिळवणाऱ्या दिव्यांकाने आपल्या एक्सप्रेशन्सच्या जोरावर हरयाणवी गाण्यांच्या जगात स्वतःची एक वेगळी ओळख निर्माण केली होती.

सुनंदा शर्माच्या एका गाण्यावर तिने निळा सूट घालून व्हिडीओ बनवला होता, जो प्रचंड व्हायरल झाला. त्याला २० दशलक्ष व्ह्यूज मिळाले आणि तिथूनच तिचं आयुष्य बदललं.सोशल मीडियावरून मिळालेल्या प्रसिद्धीनंतर दिव्यांकाने प्रोफेशनल म्युझिक व्हिडिओमध्येही नाव कमावलं होतं. तिने ५० हून अधिक सुपरहिट हरयाणवी गाण्यांमध्ये काम केलं.मेरठमधून बीसीए पूर्ण केलं केल्यानंतर तिने सिक्कीममधून एमबीएचं शिक्षण घेतलं होतं. कलेची आवड असल्यामुळे ती या क्षेत्राकडे वळली आणि अल्पावधीतच लोकप्रियतेच्या शिखरावर पोहोचली.

इतर बातम्या
Join Whatsapp Group