अनुष्का शर्मा अनेक महिन्यांपासून लंडनमध्येच आहे. गेल्या काही वर्षांपासून ती सिनेइंडस्ट्रीपासूनही दूर आहे. तिने मुलगा अकायलाही लंडनमध्येच जन्म दिला. आता बऱ्याच महिन्यांनी अनुष्का मुंबई विमानतळावर दिसली. ब्लॅक कॅज्युअल आऊटफिटमध्ये तिने एन्ट्री घेतली. बऱ्याच वर्षांनी तिला पाहून चाहतेही खूश झालेत. तिचा व्हिडिओ आता व्हायरल होत आहे.
अनुष्का आणि विराट कोहली दोन्ही मुलांसह लंडनमध्येच स्थायिक झाल्याच्या चर्चा आहेत. आता अनुष्का एकटीच मुंबईत परतली आहे. ब्रँड एंडॉर्समेंट्स आणि वर्क कमिटमेंट्समुळे ती आली आहे. फुल ब्लॅक आऊटफिट, ब्लॅक गॉगल अशा लूकमध्ये दिसली. पापाराझींसमोर तिने पोज दिली आणि नंतर ती कारमध्ये बसून रवाना झाली. सेलिब्रिटी फोटोग्राफर्सने अनुष्काचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला आहे.
अनुष्का शर्माला पाहून चाहतेही खूश झालेत. या व्हिडिओवर नेटकऱ्यांनी काही मिनिटातच कमेंट्स केल्या आहेत. अनुष्काने याचवर्षी अकायला जन्म दिला. अनेकदा लंडनमधून कोहली कुटुंबाचे काही व्हिडिओ व्हायरल झाले आहेत. विराट कोहलीही वर्ल्ड कपनंतर लंडनला रवाना झाला तेव्हापासून तिथेच आहे. अनुष्काचा 'चकदा एक्सप्रेस' सिनेमाच्या रिलीजच्या प्रतिक्षेत आहे. नेटफ्लिक्सवर सिनेमा प्रदर्शित होणार असल्याची चर्चा आहे. मात्र अद्याप तारीख निश्चित झालेली नाही.