भारतीय क्रिकेटपटू विराट कोहलीने 12 मे 2025 रोजी कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली. या निर्णयानंतर विराट कोहली पत्नी अनुष्का शर्मासह वृंदावन येथील प्रसिद्ध आध्यात्मिक गुरु प्रेमानंदजी महाराज यांच्या आश्रमात गेले. या भेटीत दोघेही भावनिक झाले आणि अनुष्का शर्मा तर अश्रू अनावर झालेले पाहायला मिळाले आहेत.
प्रेमानंदजी महाराजांनी विराट कोहली आणि अनुष्का शर्माला "गुरु मंत्र" दिला आणि सांगितले की, प्रभुची कृपा म्हणजे केवळ भौतिक वैभव नव्हे, तर अंतर्मनातील चिंतनात बदल होणे. ते म्हणाले, "देवाचा जप करत राहा, आणि कशाचीही चिंता करु नका" या भेटीदरम्यान अनुष्का शर्मा साध्या काळ्या आणि पांढऱ्या रंगाच्या सूटमध्ये, मेकअपशिवाय दिसली, तर विराट कोहलीने साधे शर्ट-पँट परिधान केले होते. यावेळी अनुष्काचा साधेपणा आणि नम्रता चाहत्यांच्या मनाला भावली.
विराट- अनुष्काने प्रेमानंद महाराजांचा संवाद सोशल मीडियावर व्हायरल
या आध्यात्मिक प्रवासामुळे विराट आणि अनुष्काने आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्यातील नवीन अध्यायाची सुरुवात केली आहे. आश्रमात पोहोचताच प्रेमानंद महाराजांनी विचारले, "प्रसन्न आहात का?" यावर विराटने उत्तर दिले, "हो, ठीक आहे."
यानंतर महाराजांनी प्रभूच्या कृपेच्या खऱ्या अर्थावर प्रकाश टाकला. त्यांनी सांगितले की, "प्रभूची कृपा म्हणजे केवळ भौतिक वैभव नव्हे, तर अंतर्मनातील चिंतनात बदल होणे. जेव्हा प्रभू कृपा करतात, तेव्हा ते संतांचा संग देतात आणि जीवनात प्रतिकूलता आणतात, ज्यामुळे अंतर्मन शुद्ध होते." या संवादादरम्यान अनुष्काने विचारले, "नामजपाने हे सर्व साध्य होईल का?" यावर महाराजांनी उत्तर दिले, "पूर्णपणे. मी स्वतःच्या अनुभवावरून सांगतो की, नामजप केल्यानेच भगवंताची प्राप्ती होते." या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.
ज्यामध्ये अनुष्का आणि विराट भावनिक अवस्थेत प्रेमानंद महाराजांचे विचार ऐकत आहेत. या आध्यात्मिक अनुभवामुळे, विराट आणि अनुष्काच्या जीवनात नवीन ऊर्जा आणि प्रेरणा मिळाली आहे.