इंग्लंडविरुद्ध लॉर्ड्स टेस्टमध्ये झालेल्या निसटत्या पराभवाने भारतीय संघाला मोठा धक्का बसला आहे. पाच सामन्यांच्या मालिकेत भारताला 2-1 अशी आघाडी मिळवण्याची मोठी संधी होती, पण सामना हातातून गेला.
या पराभवानंतर भारताचे माजी क्रिकेटपटू मदन लाल यांनी विराट कोहलीला पुन्हा टेस्ट क्रिकेटमध्ये परत येण्याचं आवाहन केलं आहे. कोहलीने या मालिकेआधीच टेस्ट क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली होती. पण मदन लाल यांच्या मते, कोहलीला पुन्हा मैदानात उतरण्यात काहीच गैर नाही.
"विराट कोहलीचं भारतीय क्रिकेटसाठी असलेलं प्रेम आणि त्याची निष्ठा अद्वितीय आहे. माझी इच्छा आहे की त्याने टेस्ट क्रिकेटमध्ये परत यावं. यात काहीही चुकीचं नाही. या मालिकेत नाही, तरी पुढच्या मालिकेत तरी तो परत यावा." असं मदन लाल यांनी सांगितलं. "त्याने 1-2 वर्षं सहज खेळू शकतो. त्याचा अनुभव नव्या खेळाडूंना मिळणं फार गरजेचं आहे. त्याने फक्त अचानकच टेस्ट क्रिकेट सोडलं. अजून फार उशीर झालेला नाही. कृपया परत ये." असेही ते म्हणाले.