‘किंग संपला’,...  विराट कोहलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नक्की काय घडलं ?
‘किंग संपला’,... विराट कोहलीबद्दल वादग्रस्त वक्तव्य, नक्की काय घडलं ?
img
दैनिक भ्रमर
भारतीय क्रिकेट टीमचा दिग्गज फलंदाज विराट कोहलीला  क्रिकेट विश्वात किंग कोहली म्हटलं जातं.परंतु आता याच  किंग कोहली विषयी एक वादग्रस्त वाकवा करण्यात आले आहे.  ‘किंग संपला’  असा वक्तव्य ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सायमन कॅटिच याने केले आहे. 

 विराट कोहलीसाठी यंदाचा ऑस्ट्रेलिया दौरा निराशावादी ठरला बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये चार सामन्यात विराटच्या बॅटमधून फक्त एक शतक निघालं आहे. त्याशिवाय एकही मोठी इनिंग त्याला खेळता आलेली नाही. मेलबर्न कसोटीच्या दुसऱ्या डावात टीम इंडिया 340 धावांचा पाठलाग करताना विराटची बॅट अजिबात चालली नाही. तो स्वस्तात बाद झाला. त्यानंतर कॉमेंट्री करणारा ऑस्ट्रेलियाचा दिग्गज सायमन कॅटिचने विराट कोहलीबद्दल एक मोठं वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. त्याने ‘किंग संपला’ असं म्हटलं आहे. विराटला क्रिकेट विश्वात किंग कोहली म्हटलं जातं.

IPL मध्ये विराट आणि कॅटिच एकाच टीममध्ये होते. सायमन कॅटिच रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा हेड कोच होता. सायमन कॅटिचने विराट बद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं. त्याचवेळी भारताचा दिग्गज गोलंदाज जसप्रीत बुमराहच कौतुक केलं. विराटची किंगची उपाधी आता बुमराहने मिळवली आहे, असं कॅटिच म्हणाला. विराट बाद झाल्यानंतर इंग्लिश कॉमेंट्री पॅनलमध्ये बसलेल्या कॅटिचने किंग संपला असं वक्तव्य केलं. “किंग विराटची गती मंदावली आहे. किंग बुमराहने जबाबदारी उचलली आहे. कोहली स्वत:वर निराश आहे. त्याला मोठी इनिंग खेळायची होती. पण तो आऊट झाला” असं कॅटिच म्हणाला.

दरम्यान, सायमन स्पष्टपणे म्हणाला, क्रिकेटमध्ये किंगचा दर्जा आता बुमराहकडे जातोय. मेलबर्न टेस्टच्या चौथ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या दुसऱ्याडावात बुमराहने जेव्हा ट्रेविस हेडला आऊट केलं, त्यावेळी कॅटिच त्याला किंग म्हणाला. हेडचा विकेट पडल्यानंतर सायमन म्हणाला की, ‘हे अधिकृत आहे. बुमराह किंग आहे’


इतर बातम्या
Join Whatsapp Group