भारतीय संघ बॉर्डर गावसकर ट्रॉफीसाठी ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर आहे. पाच सामन्यांच्या कसोटी मालिकेतील अॅडलेडच्या मैदानात रंगणाऱ्या सामन्याआधी टीम इंडियातील खेळाडू दोन दिवसीय सराव सामन्यासाठी कॅनबेरा येथे पोहचले आहेत. गुरुवारी ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथनी अल्बानीज आणि भारतीय संघातील खेळाडू यांची ग्रेट भेट झाल्याचा सीन पाहायला मिळाला.
कॅनबेरा येथील संसद भवनात झालेल्या या खास भेटीत कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करुन दिली. या भेटीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसतोय.
जो व्हिडिओ समोर आला आहे त्यात टीम इंडियाचा कॅप्टन रोहित शर्मा ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांना संघातील खेळाडूंची ओळख करून देताना दिसते. ऑस्ट्रेलियन पंतप्रधान सर्वात आधी पर्थच्या मैदानात टीम इंडियाचे नेतृत्व केलेल्या जसप्रीत बुमराहशी चर्चा करताना दिसून येते. त्यानंतर ते किंग कोहलीकडे वळतात. विराट कोहली आणि ऑस्ट्रेलियन पंतप्रधान अँथनी अल्बानीज यांच्यात खास संवाद रंगल्याचेही व्हिडिओत पाहायला मिळते.
पर्थच्या मैदानात विराट कोहलीनं केलेल्या शतकी खेळीचं ते तोंडभरून कौतुक करतात. यावर विराट कोहली खास अंदाजात रिप्लाय देतानाही पाहायला मिळते. "पर्थवरची शतकी खेळी खूपच छान. आम्हाला त्या क्षणी त्रासदायक वाटले नाही," असे म्हणत कोहलीच्या शतकाचा आपल्यालाही आनंद झाला, अशा आशयाचे वक्तव्य ऑस्ट्रेलियन पंतप्रधानांनी केले.
त्यावर रिप्लाय देताना किंग कोहली नेहमी असं स्पाइसी काहीतरी जोडावं लागते. असे बोलताना दिसते. यावर हसत हसत तुम्ही भारतीय आहात, तुम्हाला ते माहिती आहे. असं म्हणत ते पुढे जाताना दिसता. त्यानंतर ऑस्ट्रेलियन पंतप्रधान रवींद्र जडेजा आणि आर अश्विन यांची भेट घेताना व्हिडिओत दिसून येते.