टीम इंडियाचा विकेटकीपर फलंदाज इशान किशन बऱ्याच काळात टीमबाहेर आहे. २०२३ पासून त्याला कोणत्याही इंटरनॅशनल फॉर्मेटमध्ये स्थान मिळालेलं नाही. नुकतंच त्याला इंग्लंड दौऱ्यासाठी इंडिया-अ संघात स्थान देण्यात आलं होतं. मात्र परंतु त्याला खेळण्याची संधी मिळाली नाही. अशा परिस्थितीत आता या तरुण क्रिकेटरने एक मोठा निर्णय घेतलाय.
मिळालेल्या माहितीनुसार , इशान आता विदेशी देशाच्या एका टीमकडून खेळणार आहे. इशान किशनने काउंटी चॅम्पियनशिपच्या दोन सामन्यांसाठी नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबसोबत करार केला आहे. तो इंग्लंडमध्ये खेळल्या जाणाऱ्या काउंटी चॅम्पियनशिपमध्ये डेब्यू करण्यास सज्ज आहे.
नॉटिंगहॅमशायर क्रिकेट क्लबने शुक्रवारी 'एक्स' या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मद्वारे इशान किशनच्या त्यांच्या टीममध्ये सामील झाल्याची माहिती आहे.
क्लबने लिहिले की, 'ट्रेंट ब्रिजमध्ये आपले स्वागत आहे, इशान किशन.' क्लबने माहिती दिलीये की, भारतीय विकेटकीपर फलंदाजाने दोन सामन्यांसाठी टीमसोबत करार केलाय.
डेब्यूसाठी तयार इशान किशन नॉटिंगहॅमशायर वेबसाइटनुसार, इशान म्हटलंय की, "इंग्लंडमध्ये काउंटी क्रिकेट खेळण्याची पहिली संधी मिळाल्याबद्दल मी खूप उत्साहित आहे. माझं कौशल्य दाखवण्याची ही एक उत्तम संधी असणार आहे. मला एक चांगला क्रिकेटपटू बनण्याची इच्छा आहे. तिथल्या परिस्थितीत खेळल्याने माझे कौशल्य खरोखरच सुधारणार आहे. ट्रेंट ब्रिज हे एक प्रसिद्ध मैदान असून मी तिथे खेळण्यास उत्सुक आहे."
टीमचे मुख्य प्रशिक्षक पीटर मूर्स यांनी सांगितलं की, 'पुढील दोन चॅम्पियनशिप सामन्यांसाठी ईशानची सेवा मिळाल्याने आम्हाला आनंद होतोय. ईशान काउंटी क्रिकेटमध्ये सामील होण्यास खूप उत्सुक आहे. तो एक हार्ड-हिटिंग मिडल ऑर्डरचा फलंदाज आहे.'