४ जून २०२५
आत्ताच एक मोठी बातमी समोर आली आहे. बेंगळुरूच्या चिन्नास्वामी स्टेडियमच्या बाहेर झालेल्या विजयी मिरवणुकीत चेंगराचेंगरीची घटना घडली आहे. या दुर्घटनेत ७ जणांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे.
आरसीबी संघाने आयपीएल 2025 जिंकले आहे आणि त्यानंतर बेंगळुरुच्या चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये संपूर्ण संघाचा सन्मान केला जात आहे. मात्र या सन्मानादरम्यान चिन्नास्वामी स्टेडियम जवळ चेंगराचेंगरी होऊन त्यात ७ जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली आहे.
या चेंगराचेंगरीत 20 जण गंभीर जखमीही झाले आहे तर दहा जणांची प्रकृती गंभीर आहे. चेंगराचेंगरी मृत्युमुखी पडलेल्या मध्ये महिलांचाही समावेश आहे.
Copyright ©2026 Bhramar