विराट नव्हे, तर हा खेळाडू होणार रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु  संघाचा नवा कर्णधार
विराट नव्हे, तर हा खेळाडू होणार रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाचा नवा कर्णधार
img
Dipali Ghadwaje
सौदी अरेबियातील जेद्दाहमध्ये २४ आणि २५ नोव्हेंबरला आयपीलचा मेगा लिलाव पार पडला. या लिलावात १८२ खेळाडूंवर कोट्यावधींची बोली लागली. या लिलावात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुने मजबूत संघ निवडला आहे.

मात्र कर्णधार कोण होणार , याबाबत कुठलीही माहिती समोर आलेली नाही. संघाची यादी समोर येताच, विराट कोहलीच्या नावाची जोरदार चर्चा सुरु होती. मात्र आता विराट नव्हे, तर बंगळुरुने रिटेन केलेल्या खेळाडूकडे नेतृत्वाची जबाबदारी सोपवली जाण्याची जोरदार चर्चा आहे.

रजत पाटीदार होणार संघाचा कर्णधार?

रॉयल चॅलेजंर्स बंगळुरु संघाच्या कर्णधारपदासाठी विराट कोहलीचं नाव सर्वात पुढे होतं.   मात्र आता रजत पाटीदारला ही जबाबदारी सोपवली जाणार असल्याची जोरदार चर्चा रंगली आहे. रजत पाटीदार या संघाचा अनुभवी फलंदाज आहे. त्याची शानदार फलंदाजी आणि नेतृत्व क्षमता पाहून, या संघाच्या कर्णधारपदासाठी त्याचं नाव आघाडीवर आहे.
 
त्यामुळे आता आगामी हंगामात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु त्याच्यावर विश्वास दाखवणार का? हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.  
इतर बातम्या
Join Whatsapp Group