जेमिमाने वडिलांसह भारताची मान उंचावली, मागच्या वर्षी वडिलांवर लागले होते 'हे' गंभीर  आरोप
जेमिमाने वडिलांसह भारताची मान उंचावली, मागच्या वर्षी वडिलांवर लागले होते 'हे' गंभीर आरोप
img
वैष्णवी सांगळे
भारतीय महिला क्रिकेटमध्ये गुरूवारी रात्रीच्या खेळीनंतर जेमिमा रॉड्रिग्जचे नाव भारतीय कधीच विसरू शकणार नाही. नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियममध्ये जेमिमाने अभूतपूर्व खेळी केली. २०२५ च्या महिला एकदिवसीय विश्वचषक उपांत्य फेरीत भारताला ऑस्ट्रेलियाविरुद्ध विक्रमी विजय मिळवून दिल्यानंतर, जेमिमाने क्रिकेट चाहत्यांच्या मनात आपले नाव कायमचे कोरले. 



नाबाद शतक ठोकत तिने सात वेळा चॅम्पियन ठरलेल्या ऑस्ट्रेलियाला पराभवाची धूळ चारली. हा क्षण केवळ भारतीय क्रिकेट चाहत्यांसाठीच नव्हे तर तिच्या वडिलांसाठीही अभिमानाचा क्षण होता. म्हणूनच, ऑस्ट्रेलियाला नमवून भारत फायनलमध्ये पोहोचल्यानंतर, जेमिमा आणि तिचे वडील अतिशय भावूक झाल्याचे दिसून आले.

वडिलांवर धर्मांतरणाचे आरोप 
मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यात मुंबईतील सर्वात जुनं क्लबपैकी एक असलेल्या खार जिमखानाने जेमिमाच्या वडिलांवर धर्मांतरणाचे आरोप लावले होते. त्यामुळे त्यांनी जेमिमाची सदस्यता सुद्धा रद्द केली होती. जेमिमाचे वडील इवान रॉड्रिग्सवर खार जिमखाना क्लब परिसरात धार्मिक कार्यक्रम आयोजित केल्याचे आरोप केले होते. मात्र क्लबच्या सदस्यांनी यावर आक्षेप घेतला आणि या धार्मिक कार्यक्रमात लोकांना धर्मांतरणासाठी भडकवले जाते असा आरोप केला. याची चर्चा देशभरात झाली. यावादाने जेमिमा रॉड्रिग्सला मानसिक त्रास झाला, पण ती मागे हटली नाही आणि लागोपाठ मेहनत करत राहिली. 

नाशिकमध्ये मविआला खिंडार ! उदय सांगळेसह 'हा' माजी आमदार भाजपच्या वाटेवर

जेमिमाच्या डोळ्यात आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू 
भारताला विजय मिळवून दिल्यानंतर, जेमिमा रॉड्रिग्जचा एक व्हिडिओ समोर आला आहे, ज्यामध्ये ती तिच्या वडिलांना मिठी मारताना रडताना दिसत आहे. व्हिडिओमध्ये दिसणारे अश्रू हे एका वडिलांच्या आणि त्यांच्या मुलीच्या आनंदाचे आणि समाधानाचे अश्रू आहेत.  नवी मुंबईतील डी वाय पाटील स्टेडियमवर तिची सर्व स्वप्ने या अप्रतिम खेळीमुळे साकार होण्याकडे वाटचाल सुरू झाली. त्यामुळेच वडील आणि मुलगी दोघेही भावनिक झाल्याचे पाहायला मिळाले.
इतर बातम्या
Join Whatsapp Group