"या" दिग्गज खेळाडूचा क्रिकेटला रामराम! जाणून घ्या
img
Dipali Ghadwaje
इंग्लंडचा आक्रमक फलंदाज डेव्हिड मलानने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला आहे. इंग्लंडसाठी धावांचा पाऊस पाडणाऱ्या या फलंदाजाने आयसीसी टी-२० रँकिंगमध्ये अव्वल स्थानी कब्जा केला होता. दरम्यान वयाच्या ३७ व्या वर्षी त्याने आपल्या क्रिकेट कारकिर्दीला पूर्णविराम देण्याचा निर्णय घेतला आहे.

गेल्या काही महिन्यांपासून त्याला इंग्लंड संघात कमबॅक करण्याची संधी मिळत नव्हती. अखेर त्याने क्रिकेटला रामराम ठोकला आहे.

डेव्हिड मलानला भारतात झालेल्या वनडे वर्ल्डकपसाठी इंग्लंड संघात जागा मिळाली होती. मात्र त्यानंतर त्याला संघात कमबॅक करण्याची संधी मिळालेली नाही. टी-२० क्रिकेटमधील विस्फोटक फलंदाज म्हणून त्याने आपली ओळख निर्माण केली होती. मात्र संधी मिळत नसल्याने त्याला निवृत्ती घेण्याचा निर्णय घेतला.


टी-२० क्रिकेटमध्ये त्याच्या नावे १८०० हून अधिक धावा करण्याची नोंद आहे. आयसीसी टी-२० वर्ल्डकप २०२२ स्पर्धेत त्याने इंग्लंड संघाचे प्रतिनिधित्व केलं होतं. मात्र त्याला या स्पर्धेत नावाला साजेशी कामगिरी करता आली नव्हती. या स्पर्धेत त्याला अवघ्या ५६ धावा करता आल्या होत्या.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group