पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं आठवं पदक
पॅरिस पॅरालिम्पिकमध्ये भारताचा डंका! देशाला मिळालं आठवं पदक
img
Dipali Ghadwaje
भारताची पॅरालिम्पिक स्पर्धेतील पदक संख्या आता 8 झाली आहे. सोमवारी पॅरालिम्पिक एथलीट योगेश कथुनियाने भारताला आठवं पदक मिळवून दिलं आहे. योगेशने डिस्कस थ्रो एफ 56 स्पर्धेत सर्वोत्तम कामगिरी केली. तसेच दुसऱ्या स्थानावर राहात रौप्य पदक मिळवलं.

योगेशने पॅरालिम्पिक स्पर्धेत दुसऱ्यांदा भाग घेतला आहे. मागच्या पर्वात अर्थात टोक्यो पॅरालिम्पिक स्पर्धेतही यश मिळवलं होतं. तेव्हाही रौप्य आणि आताही रौप्य पदकावर मोहोर उमटवली आहे.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत त्याने डिस्कस थ्रोच्या अंतिम फेरीत 4.22 मीटर लांब थ्रो केला आणि दुसऱ्या स्थानी राहिला. या स्पर्धेत ब्राझीलच्या क्लाउडनी बतिस्ता राहिला. त्याने 46.86 मीट लांब थ्रो केला आणि सुवर्ण पदक पटकावलं. योगेशने पहिला थ्रो 42.22, दुसरा थ्रो 41.50, तिसरा थ्रो 41.55, चौथा थ्रो 40.33, पाचवा थ्रो 40.89 आणि सहावा थ्रो 39.68 मीटर लांब फेकला.

पॅरिस पॅरालिम्पिक स्पर्धेत भारताने आतापर्यंत एक सुवर्ण, तीन रौप्य आणि चार कांस्य पदकं मिळवली आहेत. भारताची नेमबाज अवनी लेखराने 10 मीटर एअर रायफल एसएच1 स्पर्धेत सुवर्ण पदक जिंकलं होतं. दुसरं पदक या स्पर्धेत भारताच्या मोना अग्रवालने मिळवलं होतं. तिने कांस्य पदकावर मोहोर उमटवली. तिसरं पदक प्रीति पालने जिंकलं. महिलांच्या 100 मीटर स्पर्धेत कांस्य पदकाची कमाई केली. तर 30 ऑगस्टला नेमबाज मनीष नरवालने चौथं पदक भारताला मिळवून दिलं. 10 मीटर एअर पिस्टल प्रकारात रौप्य पदक मिळवून दिलं.

पॅरिस पॅरालिम्पिकच्या तिसऱ्या दिवशी म्हणजेच 31 ऑगस्टला महिला नेमबाज रुबीना फ्रान्सिसने पाचवं पदक मिळवून दिलं. आणखी एक कांस्य पदक भारताच्या पारड्यात पडलं. प्रीति पालने या स्पर्धेतील वैयक्तिक दुसरं आणि भारतासाठी सहावं पदक जिंकलं. 200 मीटर शर्यतीत तिने कांस्य पदकाची कमाई केली. तर पुरुषांच्या उंच उडी स्पर्धेत निषाद कुमारने रौप्य पदक जिंकलं. हे भारताचं सातवं पदक होतं. आता योगेश कथुनियाने मेन्स डिस्कर थ्रोमध्ये रौप्य पदक जिंकलं आहे.
इतर बातम्या
Join Whatsapp Group