पॅरिसमधून आणखी एक वाईट बातमी ; कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत
पॅरिसमधून आणखी एक वाईट बातमी ; कुस्तीपटू अंतिम पंघाल अडचणीत
img
Dipali Ghadwaje
पॅरिस ऑलिम्पिक मधील विनेश फोगाटचं प्रकरण ताजं असतानाच, आता पैलवान अंतिम पंघाल अडचणींत सापडल्याची बातमी समोर आली आहे. 

अंतिमनं पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिलांच्या 53 किलो वजनी कुस्ती स्पर्धेत भाग घेतला होता. हा तोच वजनी गट आहे, ज्यामधून आधी भारताची धडाकेबाज महिला कुस्तीपटू विनेश फोगाट खेळत होती. आश्चर्याची बाब म्हणजे, एकीकडे विनेश फोगाट अपात्र ठरली आहे, तर दुसरीकडे अंतिम अडचणींत सापडली आहे. 

महिला कुस्तीपटू अंतिम आणि तिच्या बहिणीची पॅरिसमधून हकालपट्टी करण्यात येणार आहे. अंतिमने ज्या गावात सामना सुरू होता, तिथून आपलं काही सामान आणण्यासाठी स्वतःचं अधिकृत ओळखपत्र तिच्या छोट्या बहिणीला दिलं आणि सुरक्षारक्षकांनी तिला पकडलं. अशा परिस्थितीत फ्रेंच अधिकाऱ्यांकडून शिस्तभंगाचा आरोप झाल्यानंतर भारतीय ऑलिम्पिक संघटनेनं या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे.

अखेर भारतीय कुस्तीपटू अंतिम, तिची लहान बहिण आणि सपोर्ट स्टाफची रवानगी पुन्हा भारतात करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 

खरंतर, महिलांच्या 53 किलो वजनी गटातील आपला पहिला सामन्यात गमावल्यानंतर कुस्तीपटू अंतिम स्पर्धेतून बाहेर पडली. तिचं नामांकित प्रशिक्षक भगतसिंह आणि वास्तविक प्रशिक्षक विकास ज्या हॉटेलमध्ये थांबले होते तिथे ती गेली. तिनं आपल्या बहिणीला स्वतःचं ओळखपत्र दिलं आणि जिथे सामना होता, तिथून आपलं सामान  आणण्यास सांगितलं. अंतिमचं ओळखपत्र घेऊन बहिण स्पोर्ट्स व्हिलेजमध्ये प्रवेश करण्यात यशस्वी झाली खरी, पण अंतिमचं सामना घेऊन परतताना तिला सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पकडलं. 

अंतिमच्या बहिणीची पोलिसांनी चौकशी केली आणि तिचा जबाब नोंदवण्यासाठी स्थानिक पोलीस ठाण्यात नेण्यात आलं. त्यानंतर 19 वर्षीय ज्युनियर वर्ल्ड चॅम्पियन कुस्तीपटू अंतिमलाही तिचा जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी बोलावलं.
 
 
इतर बातम्या
Join Whatsapp Group