धक्कादायक! पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या आधी हमासने व्हिडीओद्वारे दिली 'ही' धमकी
धक्कादायक! पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या आधी हमासने व्हिडीओद्वारे दिली 'ही' धमकी
img
DB
पॅरिस ऑलिम्पिक खेळ 26 जुलैपासून सुरू होणार असून 11 ऑगस्ट रोजी संपणार आहेत. या खेळांमध्ये 196 देशांतील 10 हजारांहून अधिक खेळाडू सहभागी होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या स्पर्धेची तयारी सध्या जोरदार सुरु आहे. याचदरम्यान पॅरिस ऑलिम्पिक 2024च्या दरम्यान हल्ला करण्याची धमकी हमासने  दिली आहे.

हमासने धमकी देण्याचा व्हिडीओ जारी केला आहे. ऑलिम्पिकदरम्यान पॅरिसच्या रस्त्यांवरुन रक्ताच्या नद्या वाहतील, अशी धमकी हमासकडून देण्यात आली आहे. धमकी देणाऱ्या व्यक्तीने तोंडावर मास्क घातले असून त्याच्या कपड्यावर पॅलेस्टाइनचा झेंडा असल्याचे व्हिडीओमध्ये दिसत आहे. 



 पॅरिस ऑलिम्पिकमध्ये 4 नवीन खेळांचा समावेश-
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये चार नवीन खेळांचा समावेश करण्यात आला आहे. यावेळी ब्रेकडान्सिंग ऑलिम्पिकमध्ये पदार्पण करणार आहे. यावेळी स्केटबोर्डिंग, सर्फिंग आणि स्पोर्ट्स क्लाइंबिंगचाही ऑलिम्पिकमध्ये समावेश करण्यात आला आहे.

मात्र, यावेळी काही खेळ ऑलिम्पिकचा भाग नसतील. कराटे, बेसबॉल आणि सॉफ्टबॉल हे खेळ टोकियो ऑलिम्पिकचा भाग होते, पण यावेळी ते काढून टाकण्यात आले आहेत. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये समाविष्ट करण्यात आलेल्या चार नवीन खेळांमध्ये एकही भारतीय खेळाडू पात्र ठरलेला नाही.

  
इतर बातम्या
Join Whatsapp Group