दुर्दैवी घटना!  हवेत पॅराशूट न उघडल्याने 5 जणांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ
दुर्दैवी घटना! हवेत पॅराशूट न उघडल्याने 5 जणांचा मृत्यू; पाहा व्हिडिओ
img
Dipali Ghadwaje
नवी दिल्ली : गाझामध्ये मदत सामुग्री असलेले पॅराशूट अंगावर पडून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. पॅराशूट हवेत उघडले न गेल्याने ते मुक्तपणे खाली कोसळले दरम्यान या घटनेत यात पाच जणांचा मृत्यू झालाय तर अनेकजण जखमी झाल्याची माहिती आहे. एका वृत्त संस्थेने यासंदर्भातील वृत्त दिलं आहे.  

यूएस, जॉर्डन, इजिप्त, फ्रान्स, नेदरलँड आणि बेल्जियम गाझामध्ये गेल्या काही दिवसांपासून मदत पुरवत आहेत. इस्राइलसोबतच्या संघर्षामुळे गाझामधील परिस्थिती अत्यंत बिकट झाली आहे. त्यामुळे कृत्रिम दुष्काळ निर्माण झाला आहे. यासाठी काही देशांकडून हवेतून मदत दिली जात आहे. दरम्यान हवेत पॅराशूट उघडले गेले नाही आणि मदत सामुग्री खाली उभे असलेल्यांच्या लोकांवर पडली. कोणाकडून पाठवलेली ही मदत होती हे अद्याप कळू शकलेलं नाही.  

मिळालेल्या माहितीनुसार , स्थानिक वेळेनुसार ११:३० वाजता हा अपघात घडला. गाझामध्ये संयुक्तपणे मदत दिली जात होती. उत्तर गाझातील भाग मदतीपासून वंचित आहे. अशा वेळी कार्गो सी-१७ मधून अल-शफ्ती येथे मदत सामुग्री हवेतून रॉकेटप्रमाणे खाली पडत असल्याचं व्हिडिओमध्ये दिसत आहे. 

त्यातील अनेक मदत सामुग्री  व्यवस्थितपणे जमिनीवर उतरत असल्याचं दिसत आहे. त्यातील एक हवाई मदत मुक्तपणे खाली पडत असल्याचं दिसतंय.


जवळपास २३ लाख लोकसंख्या ही उपासमारीच्या उंबरठ्यावर आहेत. अनेक लहान मुले अन्नासाठी तडफडत आहेत. दरम्यान, हमास आणि इस्राइल सैन्यामध्ये गेल्या काही महिन्यांपासून भीषण संघर्ष आहे. अद्याप हा संघर्ष थांबण्याचे चिन्हं नाहीत. इस्राइलने आक्रमक पवित्रा घेतला असल्याने अनेक निष्पाप लोकांचा बळी गेला आहे. 
इतर बातम्या
Join Whatsapp Group