निवृत्त भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा गाझा हल्ल्यात मृत्यू ; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम
निवृत्त भारतीय लष्करी अधिकाऱ्याचा गाझा हल्ल्यात मृत्यू ; दोन महिन्यांपासून UN सोबत करत होते काम
img
Dipali Ghadwaje
गाझामध्ये सुरू असलेल्या संघर्षांत काल(मंगळवारी) एका निवृत्त भारतीय कर्नलचा मृत्यू झाला.  दक्षिण गाझामधील रफाह शहरातील खान युनिस परिसरात झालेल्या गोळीबारात संयुक्त राष्ट्राचा एक कर्मचारी ठार झाला तर दुसरा जखमी झाला. या कर्मचाऱ्याचं नाव अनिल वैभव काळे असून ते भारतीय लष्कराचे निवृत्त कर्मचारी होते. ज्यांनी 14 मे 2024 म्हणजे त्यांच्या मृत्यूच्या सुमारे 2 महिने आधी गाझामध्ये सुरक्षा सेवा समन्वयक म्हणून संयुक्त राष्ट्रांसाठी काम करण्यास सुरुवात केली होती. या घटनेनंतर जगभरात खळबळ उडाली आहे. कारण, यूएनचा मधील कर्मचाऱ्याचा हा पहिलाच मृत्यू होता.

मिळालेल्या माहितीनुसार , कर्नल वैभव अनिल काळे (वय ४६) असे त्यांचे नाव आहे. संयुक्त राष्ट्रांतर्फे गाझा पट्टीतील राफा शहरात काम करत असताना त्यांच्या वाहनावर हल्ला झाला आणि यात काळे यांचा मृत्यू झाला.  वैभव काळे हे मूळ पुण्याचे आहेत. त्यांच्यामागे पत्नी आणि दोन मुले आहेत.

ते '११ जम्मू-का प्रेर रायफल्स मध्ये कार्यरत होते. २०२२ भारतीय लष्करातून स्वेच्छानिवृत्ती स्वीकारली होती. दोनच महिन्यांपूर्वी त्यांनी संयुक्त राष्ट्रांमध्ये सुरक्षा समन्वय अधिकारी म्हणून काम सुरू केले होते. गाझा पट्टीतील राफा शहरातून खान युनिस शहराकडे संयुक्त राष्ट्रांच्या वाहनातूनच जात असताना त्यांच्या मोटारीवर हल्ला झाला. यात काळे यांचा मृत्यू झाला, अशी माहिती संयुक्त राष्ट्रांतर्फे जाहीर करण्यात आली आहे. काळे यांच्या गाडीवर कोणी आणि कसा हल्ला केला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.

या हल्ल्यात आणखी एक जण जखमी झाला आहे. गाझा पट्टीतील संघर्षात अनेक निष्पाप लोकांचा मृत्यू होत असून सामान्य नागरिकच नाहीत, दर मानवतावादी दृष्टिकोनातून मदत करणाऱ्यांनाही प्राण गमवावे लागत असल्याचे संयुक्त राष्ट्रांनी निवेदनात म्हटले आहे.

संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँटोनिओ गुटेरेस यांनी काळे यांच्या मृत्युबद्दल दुःख व्यक्त केले आहे. गाझामधील संघर्षांत संयुक्त राष्ट्रांचे १९० कर्मचारी मृत्युमुखी पडले आहेत. मात्र, यांच्यापैकी फक्त वैभव काळे हेच विदेशी होते, बाकी सर्व इस्रायली किंवा पॅलेस्टिनी नागरिक होते. 
 
Israel | Hamas | war |
इतर बातम्या
Join Whatsapp Group