इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक; २४ तासात 'इतके' पॅलेस्टाईन नागरिक ठार
इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक; २४ तासात 'इतके' पॅलेस्टाईन नागरिक ठार
img
Dipali Ghadwaje
इस्रायल आणि पॅलेस्टाइनमधील संघर्ष आता विकोपाला गेला दिवसेंदिवस तेथील परिस्तिथी बिकट होत चालली आहे. इस्राइलने गाझापट्टीत आपलं सैन्य उतरवलं आहे. इस्राइलकडून गाझापट्टीत एअर स्ट्राईक करण्यात आला आहे. या हल्ल्यात ३२४ पॅलेस्टाईन नागरिक ठार झाले आहेत. तर १ हजार जण जखमी झाले आहेत. गाझाच्या आरोग्य मंत्रालयाने याविषयी माहिती दिलीय. 

याबात मिळालेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये १२६ मुलांचा आणि ८८ महिलांचा समावेश आहे. लेबनॉनमधून घुसखोरीचा प्रयत्न करणारे अतिरेकी ड्रोनने मारले गेल्याची बातमी रॉयटर्सने दिली आहे. त्याप्रमाणे इस्राइलच्या हवाई दलाच्या दावा केलाय की, हमासच्या एरियल यंत्रणेचा म्होरक्या मेरद अबू मेरद याचाही खात्मा झालाय. 

दरम्यान इस्राइलकडून गाझामधील नागरिकांना दक्षिण भागातून निघून जाण्यास सांगितले आहे. इस्राइल पंतप्रधान बेंजामिन नेत्यान्याहूने आता जमिनीवरुन आमक्रण करण्याची तयारी केली आहे. 

त्यासाठी इस्राइलच्या सैन्याचे टॅक गाझापट्टीत जवळ जमा झाले आहेत. गाझापट्टीत इस्राइलच्या सैनिकांकडून छापे मारले जात आहेत. दरम्यान इस्त्राइलकडून गाझामध्ये करण्यात आलेल्या हल्ल्यांमुळे १ हजार ७९९ जणांचा मृत्यू झालाय. तर ६ हजारहून अधिक लोक जखमी झाले आहेत, अशी माहिती रॉयटर्सने आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने दिलीय.

युनायटेड नेशन्सचे दूत रियाद मन्सूर यांनी संयुक्त राष्ट्राचे सरचिटणीस अँटोनियो गुटेरेस यांना “मानवतेविरुद्धचे गुन्हे” थांबवण्यासाठी आणखी काही तरी कारवाई करावी असे आवाहन केले आहे.

 
Israel |
इतर बातम्या
Join Whatsapp Group