इस्रायली सैन्याचे मोठे ऑपरेशन!  इस्रायली सैन्याकडून 250 ओलिसांची सुटका, 60 हमास दहशतवादी ठार
इस्रायली सैन्याचे मोठे ऑपरेशन! इस्रायली सैन्याकडून 250 ओलिसांची सुटका, 60 हमास दहशतवादी ठार
img
Dipali Ghadwaje
 इस्रायल आणि पॅलेस्टाईन यांच्यात संघर्ष सुरूच आहे. इस्त्राइल आणि पॅलेस्टाइनच्या या संपूर्ण जगाचे लक्ष या युद्धाकडे लागले आहे. दरम्यान, इस्रायली लष्कराने ७ ऑक्टोबर रोजी हमासच्या दहशतवाद्यांविरोधात केलेल्या कारवाईचा व्हिडिओ जारी केला आहे. यामध्ये इस्त्रायली संरक्षण दलाचे सैनिक एका कंपाऊंडमध्ये घुसून हमासच्या दहशतवाद्यांनी ओलीस ठेवलेल्या लोकांची सुटका करत असल्याचे दिसत आहे.

या व्हिडीओमध्ये इस्त्राइली डिफेन्स फोर्सेसचे जवान ओलीस ठेवलेल्या लोकांना हमासच्या तावडीतून सोडवताना दिसत आहेत. या लष्करी जवानांचे बॉडी कॅम फुटेज सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्सवर पोस्ट करण्यात आले आहे. 

आयडीएफने यासोबत माहिती दिली की, इस्त्राइली सेनेने गाझा सेक्योरिटी फेन्सच्या जवळ एक लाइव्ह ऑपरेशन करत हमास दहशतवाद्यांकडून ओलीस ठेवण्यात आलेल्या २५० जणांची सुटका केली. यादरम्यान हमासच्या ६० हून अधिक दहशतवाद्यांना देखील ठार करण्यात आल्याचं देखील सांगण्यात आलं.

दरम्यान आयडीएफने दिलेल्या माहितीनुसार ७ ऑक्टोबर रोजी सूफा सैन्य चौकीवर ताबा मिळवण्यासाठी प्लेटिला १३ यूनिट ही गाझा सेक्योरिटी फेन्सजवल तैनात करण्यात आली होती.

या जवानांनी जवळपास २५० ओलिसांची सुटका केली आहे. यादरम्यान ६० हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आले असून २६ जणांना ताब्यात घेण्यात आले. ज्यामध्ये हमास दक्षिणी नौदल डिव्हीजनचा उप कमांडर मोहम्मद अबू अली देखील होता.

 
इतर बातम्या
Join Whatsapp Group